आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुवाहाटी मंदिरात दिसला 'लाइफ ऑफ पाय'चा क्षण:ब्रह्मपुत्रा नदीत 10 तास पोहत राहिला वाघ, अरुंद खडकांमध्ये अडकला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आसाममधील गुवाहाटी येथील मंदिरात मंगळवारी सकाळी लोकांना 'लाइफ ऑफ पाय'चा क्षण पाहायला मिळाला. येथे रॉयल बंगाल टायगरने 10 तासांच्या प्रयत्नानंतर ब्रह्मपुत्रा नदी पार केली. म्हणजेच त्याने संपूर्ण 120 किलोमीटरचा प्रवास पाण्यात केला. यानंतर तो अरुंद खडकात अडकला, मात्र नंतर वन पथक आणि पोलिसांनी त्याची सुटका केली.

याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाघ नदीत खूप वेगाने पोहताना दिसत आहे. त्याचा प्रवास संपताच तो गुवाहाटीजवळील मयूर द्वीपमधील एका अरुंद गुहेत लपून बसतो. ही गुहा प्राचीन उमानंद मंदिरापासून खूप प्रसिद्ध आहे.

6 तासांनंतर सुखरूप बाहेर काढले
मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, वाघाला पाहताच मंदिरात उपस्थित भाविक आणि पुजारी थक्क झाले. त्यानंतर पोलीस व वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. 40 जणांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मंदिरात दररोज शेकडो लोक येतात, या घटनेच्या वेळीही अनेक लोक तेथे उपस्थित होते. सर्वांना तेथून काढण्यात आले. त्यानंतर वाघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. कारण वाघ दोन अरुंद खडकांमध्ये अडकला होता. 6 तासांनंतर त्याची सुटका करण्यात आली. त्यांनतर त्याला प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात आले.

वाघ नॅशनल पार्कमधील
वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथून 120 किमी अंतरावर असलेल्या ओरंगा राष्ट्रीय उद्यानातून हा वाघ पळून आला असावा. तो ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी पीत असताना नदीच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...