आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gwalior Fire Accident Updates | Massive Fire Breaks Out At Three Storey Building In Madhya Pradesh Gwalior On Roshni Ghar Road, Roshni Ghar Mohalla

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्वाल्हेरमध्ये आगडोंब:तीन मजली इमारतीला आग: 3 चिमुकल्यांसह 7 जणांचा होरपळून मृत्यू, 11 जण सुखरूप बचावले

ग्वाल्हेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्मीसह अग्निशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी, जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक

शहरातील रोशनी घर परिसरात एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एकूण 7 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांमध्ये तीन लहानग्यांचा देखील समावेश आहे. ही घटना इंदरगंज चौक परिसरात असलेल्या पोलिस स्टेशनपासून 100 मीटर अंतरावर घडली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत 11 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. या तीन मजली इमारतीमध्ये एकूण 25 लोक राहत होते. तर घरमालकाचे नाव साकेत असल्याचे सांगितले जात आहे.

होरपळलेल्या अवस्थेत सापडले दोन मुलींचे मृतदेह

आग लागून इतकी झपाट्याने पसरली की कुणालाही घराबाहेर पडता येणे शक्य झाले नाही. अशात घरात अडकलेल्यांमध्ये 3 चिमुकल्यांचा देखील समावेश होता. यात दोन मुली आणि एक 10 वर्षांच्या मुलाचा समावेश होता. या तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आगीत होरपळलेल्या अवस्थेत सापडले आहेत. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे. याच इमारतीमध्ये ऑइल पेंटचे एक दुकान सुद्धा होते. त्यामुळे, आग झपाट्याने पसरली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. आग इतकी मोठी होती की तीन किलोमीटर दूरपासून सुद्धा ही आग पाहिला जाऊ शकत होती.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने आर्मीकडे मोर्चा दिला होता. आर्मीनेच रेस्क्यू ऑपरेशन करून शक्य तेवढ्या लोकांना आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. फायर ब्रिगेडचे 10 बंब घटनास्थळी बोलावण्यात आले. सध्या आगीवर नियंत्रण मिळण्यात आले असून जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. त्यातही जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक मानली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...