आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमात धोकाः तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा:वाहने अडवली, वृद्धाची दुचाकी हिसकावली, कारच्या बोनटवर चढून गोंधळ घातला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भर रस्त्यात वाहनांना अडवून धिंगाणा घालवणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहे. यात एक तरुणी रस्त्यात गाडी अडवताना तसेच कारच्या बोनटवर बसून धिंगाणा घालताना दिसते. तिला समजावणाऱ्या लोकांशीही ती गैरवर्तन करत असल्याचे यात दिसते. ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील असल्याचे समजते आहे.

ग्वाल्हेरमधील घटना

ग्वाल्हेरच्या फुल बाग चौकात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या चौकात 27 मार्च रोजी दुपारच्या सुमारास एक तरुणी रस्त्यावर आली आणि वाहनांना अडवायला लागली. वाहनधारकांना अडवून ती त्यांच्याशी गैरवर्तनही करत होती. एका दुचाकीस्वाराची दुचाकीही तिने चालवली. यानंतर पोलिस बॅरिकेड पाडले. तसेच एका कारच्या बोनटवर बसून धिंगाणा घातला. तिला उतरवण्यासाठी लोक गोळा झाले असता त्यांच्यासोबतही तिने गैरवर्तन केले.

नागरिकांनी केला व्हिडिओ रेकॉर्ड

हा सर्व प्रकार बघणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात या घटनेचे चित्रण केले. तरुणीच्या धिंगाण्याचे हे व्हिडिओ नंतर सोशल मीडियात व्हायरल झाले. जवळपास एक तास ही तरुणी तिथे धिंगाणा घालत होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत तरुणीला ठाण्यात नेले.

प्रेमात धोका मिळाल्याने कृत्य!

ठाण्यात त्या तरुणीची चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार त्या तरुणीला प्रेमात धोका मिळाल्याने ती त्रस्त आहे. ती मानसिकदृष्ट्या त्रासात असल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर तिने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.