आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gyanvapi Kashi Vishwanath Dispute; Supreme Court Hearing Update | Muslim Side Plea | Gyanvapi Kashi Vishwanath

ज्ञानवापी-काशी विश्वनाथ वाद:मुस्लिम बाजूने वजूसाठी पर्यायी व्यवस्थेची मागणी, 14 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने मुस्लिम बाजूने वजूची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. 14 एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ही तारीख निश्चित केली.

वाराणसीच्या काशी विश्वनाथ-ज्ञानवापी प्रकरणातील मुस्लिम बाजूच्या नव्या याचिकेवर 14 एप्रिल रोजी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. या याचिकेत मुस्लिम पक्षाने म्हटले होते की, त्यांना मशिदीच्या आवारात रमजान दरम्यान वजू (धार्मिक कामासाठी चेहरा आणि हात धुणे) करण्याची परवानगी द्यावी.

अंजुमन इंतेजामिया मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव

रमजानच्या पवित्र महिन्यात नमाज अदा करण्यापूर्वी वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद संकुलातील वजुखाना सील केल्याबद्दल अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

रमजान महिन्यात पुरेशी सुविधा उपलब्ध

मस्जिद समितीतर्फे ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी रमजानचा महिना सुरू असून पुरेशी व्यवस्था करावी, असे सांगून या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायपीठाला केली. ते म्हणाले की, वजूसाठी सध्या ड्रमचा वापर करुन त्यातील पाणी वापरण्यात येत असून रमजानच्या पार्श्वभूमीवर नमाज्यांची संख्या वाढली आहे. 14 एप्रिल रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठासमोरही या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले.