आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्ञानवापी मशीद वाद प्रकरणात न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर शनिवारी सर्व्हेचे काम पुन्हा सुरू झाले. कोर्ट कमिशनर अजयकुमार मिश्र, विशालसिंह आणि अधिकारी, दोन्ही बाजूंच्या ५२ जणांच्या पथकाने कडक सुरक्षा व्यवस्थेत ज्ञानवापी मशीद परिसरात प्रवेश केला. मशिदीच्या तळघरांतील चारही खोल्यांचा सर्व्हे करण्यात आला. तळघरांत साप असल्याची शक्यता असल्याने गारुडीही सोबत होते.
पाच महिलांनी ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतींवरील देवी-देवतांची पूजा करू देण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. त्यावर वाराणसीच्या न्यायालयाने सर्व्हेचा आदेश दिला आहे. पण गेल्या आठवड्यात मुस्लिम पक्षाच्या विरोधामुळे सर्व्हे करता आला नव्हता. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने कोणत्याही स्थितीत सर्व्हे सुरू ठेवण्याचे आणि १७ मेपर्यंत अहवाल जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही सर्व्हेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. सर्व्हेसाठी मशीद परिसराजवळ एक किलोमीटरच्या कक्षेत १५०० पेक्षा जास्त जवान तैनात करण्यात आले होते. सर्व्हे रविवारीही सुरू राहील.
काही खोल्यांची कुलपे तोडून पथकाने केले सर्वेक्षण
पथकाने चारही खोल्यांचा सर्व्हे केला. त्यापैकी तीन खोल्या मुस्लिम पक्षाच्या, तर एक खोली हिंदू पक्षाच्या ताब्यात आहे. तीन खोल्यांना कुलपे लावलेली होती. काही खोल्या किल्ल्यांनी उघडल्या, तर काहींचे कुलूप तोडावे लागले. चारही खोल्यांची तपासणी करण्यात आली. भिंती, खांबांची व्हिडिओग्राफी करण्यात आली. सर्व्हेनंतर सर्व ठिकाणे पुन्हा सील करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.