आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद:‘एआयएमआयएम’चे ट्विटर अकाउंट हॅक करून ‘ॲलन मस्क’ नाव दिले, नंतर सुरळीत!

हैदराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल-मुसलमीन (एआयएमआयएम) या पक्षाचे ट्विटर अकाउंट रविवारी हॅक करण्यात आले. तथापि, काही तासांनंतर ते पूर्ववत झाले. एआयएमआयएमच्या सूत्रांनी ही माहिती दिली. सूत्रांनुसार, रविवारी दुपारी हॅकर्सने पक्षाच्या ट्विटर प्रोफाइलचे नाव बदलून ते ‘अॅलन मस्क’ असे केले.

प्रोफाइल पिक्चरच्या जागी टेस्लाच्या सीईओचा फोटो लावला. पण काही तासांनंतर हे अकाउंट पूर्ववत झाले. काही दिवसांपूर्वीही एआयएमआयएमचे अकाउंट हॅक करण्यात आले होते आणि नंतर ते पूर्ववत करण्यात आले होते. पक्षाचे मुख्यालय हैदराबादमध्ये आहे. पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले की, याबाबत हैदराबाद पोलिसांत सोमवारी तक्रार दाखल करणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...