आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Half An Hour For Pre primary, 1st To 8th Hour, Center Instructions For Online Classes

शैक्षणिक:प्री-प्रायमरीसाठी अर्धाच तास, पहिली ते आठवी पाऊणतास, ऑनलाइन क्लासेससाठी केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारने ऑनलाइन वर्गांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले

केंद्र सरकारने ऑनलाइन वर्गांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. “प्रज्ञाता’ नावाने जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने वर्गाचा वेळ आणि एकूण सत्रांची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार, पूर्वप्राथमिकच्या (प्री-प्रायमरी) विद्यार्थ्यांसाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ ऑनलाइन वर्ग असणार नाही. पहिली ते आठवीसाठी ४५-४५ मिनिटांचे दोन, तर ९वी ते १२वीसाठी ३० ते ४५ मिनिटांचे चार सत्र व्हावेत, अशी शिफारस केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे.

ऑनलाइन वर्गांबाबत पालकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हे निर्देश जारी केले आहेत. कोरोना संसर्गामुळे देशभरात १६ मार्चपासून शाळा बंद आहेत. यामुळे सुमारे २४ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. या काळात किमान एक सत्र ऑनलाइन सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी हे निर्देश घरी बसून असलेल्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करून दिले आहेत. घरी बसून शिक्षण घेण्याचे तंत्र व त्यातील गुणवत्ता टिकवणे याकडे शाळांना लक्ष द्यावे लागेल, असे निशंक यांनी म्हटले आहे.

गावी परतलेल्यांचे शाळांत दाखले

जे लोक कोरोना काळात लॉकडाऊनमुळे गावी परतले आहेत अशांच्या मुलांना गावातच शाळांमध्ये प्रवेश द्यावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत. यासाठी मुलांचा जो डेटा तयार केला जाईल त्यात प्रवासी किंवा अस्थायी अशा नोंदी कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.