आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात गेल्या एका महिन्यात नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण जवळपास दीडपट वाढले आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सरासरी जवळपास १११ हजाराच्या जवळपास रुग्ण मिळत हाेते. आता ही संख्या १५ हजारावर गेली आहे. परंतु गेल्या ५ दिवसापासून राेज सलग १६ हजारपेक्षा जास्त नवीन रुग्ण मिळण्याचा वेग साेमवारी थाेडाफार मंदावला. साेमवारी देशात १५,६१४ नवीन प्रकरणे आली जी रविवारपेक्षा कमी आहेत.
काही राज्यांतील परिस्थीती आताही चिंताजनक आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडु, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये राेज नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. आंध्र प्रदेशातही नवीन रुग्ण वाढल्यानंतर राज्य सतर्क झाले आहे. २० राज्यांत काेराेना नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. साेमवारी गेल्या २४ तासांत २० राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशांत एकाही मृत्यूची नाेंद झाली नाही. आता देशात जवळपास ८५ टक्के पेक्षा जास्त नवीन प्रकरणे फक्त ६ राज्यांतून येत आहेत. दुसरीकडे गेल्या १५ दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या वाढणेही सुरू आहे. साेमवारी देशात सक्रिय रुग्णांची संख्या १.६५ लाखांपेक्षा जास्त हाेती तर ही संख्या १५ दिवस आधी सुमारे १.३८ लाख होती.
२० पेक्षा जास्त मृत्यू झालेले महाराष्ट्र एकमेव राज्य
महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे जेथे रोज २० पेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. देशात एकूण रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांपैकी किमान अर्धे रुग्णही येथे आढळत आहेत. दुसरीकडे, देशात २० राज्ये अशी आहेत जेथे सोमवारी गेल्या २४ तासांत एकही मृत्यू झालेला नाही. देशातील १३ राज्यांत मृत्यूची संख्या १ ते ५ दरम्यान आहे.
पाकिस्तान : तज्ज्ञ म्हणतात, काेराेनाची तिसरी लाट येऊ शकते
पाकिस्तानच्या आराेग्यतज्ज्ञांनी देशात काेराेनाची तिसरी लाट येण्याची शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या मते पाकिस्तान सरकारने काेराेना प्रतिबंध लवकर हटवले. त्यामुळे नवीन प्रकरणे पुन्हा वाढू शकतात. तज्ज्ञांच्या मते ७० टक्के लाेकसंख्येला लस दिल्यानंतरच निर्बंध हटवायला हवे हाेते. पण सरकारने सर्व खुले केले आहे. सरकारने आराेग्याकडे पहिल्यांदा बघायला हवे नंतर आर्थिक आणि दुसऱ्या गाेष्टींचा क्रमांक येताे. पाकिस्तानात साेमवारी १,३९२ प्रकरणे मिळाले आणि एकूण ५.८० लाखपेक्षा जास्त प्रकरणे मिळाली आहेत.
न्यूझीलंड : लाॅकडाऊनमुळे नागरिकांमध्ये नाराजी
न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी आॅकलंडमध्ये लाॅकडाऊन लावल्यामुळे लाेकांची नाराजी सहन करावी लागत आहे. नवीन प्रकरणे मिळाल्यावर येथे लाॅकडाऊन करण्यात आला हाेता.
युरोप: डिजिटल कोविड -१९ लस पासपोर्टचा प्रस्तावित
युरोपियन कमिशनने सोमवारी नवीन डिजिटल कोविड 19 लस पासपोर्टचा प्रस्ताव दिला. मार्चमध्ये ती बनविण्याचा प्रस्ताव आहे. लोक म्हणाले की उन्हाळ्यात लोक सहजपणे फिरु शकतील,.
न्यूयाॅर्क : रुग्णालयातील रुग्णांची संख्या घटली
न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ९ डिसेंबर २०२० पासून रुग्णालयांमध्ये दाखल कोरोना रूग्णांची संख्या सर्वात खालच्या पातळीवर आली आहे.
जगात १० %पेक्षा कमी लाेकांमध्ये अँटिबाॅडी विकसित : डब्ल्यूएचओ
जागतिक आराेग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, जगात १० टक्क्यांपेक्षा कमी लाेकांमध्ये काराेनाच्या विराेधात लढण्यासाठी अँटिबाॅडी विकसित झाल्या आहेत. मुख्य वैज्ञानिक साैम्या स्वामीनाथन म्हणाल्या, केवळ लसीकरणातूनच आपण जास्तीत जास्त लाेकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ विकसित करू शकताे. त्या म्हणाल्या, सध्या लावण्यात येणारी लस काेराेनाुच्या गंभीर प्रकरणांसाठी महत्वाची ठरत आहे. किरकाेळ आजार आणि लक्षण नसलेल्या संक्रमणाच्या विराेधात लस किती परिणामकारक आहे याचा अभ्यास केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.