आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 'Hammer Missile' To Be Installed In Raphael Soon, Capable Of Blowing Up Bunkers In Range Of 70 Km

राफेलची शक्ती वाढणार:राफेलमध्ये बसवणार 'हॅमर मिसाइल', लद्दाखसारख्या पर्वतीय भागात 70 किमी रेंजमधील बंकर उडवण्यास सक्षम

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो
  • 5 राफेल विमान जुलै अखेरपर्यंत भारतात येऊ शकतात, यांना अंबाला एअरफोर्स स्टेशनवर वायुसेनेत सामील केले जाईल

या महिन्यांच्या अखेरपर्यंत भारतात येणाऱ्या राफेल विमानांना अजून पॉवरफुल बनवले जात आहे. राफेल विमानात आता 'हॅमर मिसाइल' बसवली जाणार आहे. यासाठी फ्रांससोबत चर्चा झाली असून, हॅमर मिसाइलसाठी इमरजेंसी ऑर्डर देण्यात आली आहे. 

न्यूज एजेंसीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, फ्रांस राफेलसाठी हॅमर मिसाइलची लवकरात लवकर डिलीव्हरी करण्यास तयार आहे. भारतीय वायुसेनेची गरज पाहता, फ्रांसच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्यासाठी तयार केलेला स्टॉक भारताला देण्याचा निर्णय घेतला आहे.

हॅमर मिसाइलचे वैशिष्ट्य

  • हॅमर (हायली एजाइल मॉड्यूलर म्यूनिशन एक्सटेंडेड रेंज) मीडियम रेंज मिसाइल आहे. फ्रांसने या मिसाइलला वायुसेना आणि नेव्हीसाठी तयार केले आहे. ही आकाशातून जमिनीवर वार करते.
  • हॅमर लडाखसारख्या पर्वतीय भागातील मजबूत शेल्टर आणि बंकर उडवण्यास सक्षम आहे.
  • हॅमरने 60 ते 70 किलोमीटर रेंजपर्यंतच्या टारगेटला उडवता येते.

राफेलमध्ये मीटियर आणि स्काल्पसारख्या मिसाइल असतील

  • 5 राफेल 29 जुलैला फ्रांसमधून भारतात येत आहेत. राफेलमध्ये हॅमरसोबतच 'मीटिअर' आणि लॉन्ग रेंज 'स्काल्प'सारख्या अत्याधुनिक मिसाइलही असतील. मीटियर व्हिजुअल रेंजच्या पलीकडचे टारगेट उडवणारी अत्याधुनिक मिसाइल आहे. याची रेंज 150 किमीपर्यंतची आहे.
  • स्काल्प डीप रेंजमधील टारगेट हिट करु शकते. स्काल्प अंदाजे 300 किलोमीटरपर्यंतचे टार्गेट हिट करण्यास सक्षम आहे.