आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Handlebars Are Mandatory For The Safety Of The Passenger On The Back Of The Bike, Right Back Wheel Needs Guard

बदल:दुचाकीवर मागे बसणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षेसाठी हँडल लावणे बंधनकारक, उजवीकडील बॅक व्हीलला गार्ड आवश्यक

नवी दिल्ली | शरद पांडेय3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात रस्ते अपघात कमी करण्यासाठी दुचाकी वाहनांत होतील अनेक बदल

दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना पकडण्यासाठी हँडल लावणे आता बंधनकारक होणार आहे. अपघातांची संख्या घटवण्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाने दुचाकी वाहनांत निर्धारित मानकांनुसार अनेक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने त्याची अधिसूचनाही जारी केली आहे. त्या लागू करण्यासाठी दुचाकी वाहन कंपन्यांना दीड वर्षाची मुदत देण्यात आली आहे. १ जानेवारी २०२१ पासून रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांत हे बदल सक्तीचे असतील.

- दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती झटका लागून पडू नये म्हणून गाडीवर मागे हँडल बंधनकारक. - साडी-ओढणी किंवा कपडे चाकात अडकून अपघात टाळण्यासाठी व्हील गार्ड लावावे लागेल. - अनेकदा साइड स्टँड तसेच राहिल्याने संतुलन जाते. आता साइड स्टँड गोलाकार किंवा लवचिक बनवले जाईल. - फुटरेस्ट मानकांनुसार लावले जातील. सर्व वाहनांत त्यांचा पॅटर्न एकसमान असेल. - डिलिव्हरी बॉक्सचा आकारही निश्चित केला आहे. आता या बॉक्सची लांबी ५५० मिमी, रुंदी ५१० मिमी आणि उंची ५०० मिमीपेक्षा जास्त ठेवता येणार नाही.