आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ८ पोलिसांच्या हत्या प्रकरणात २०० पोलिसांचा कसून तपास केला जाणार आहे. हे सर्व तपासाच्या जाळ्यात आले आहेत. त्यात चौबेपूर, बिल्हापूर, ककवान व शिवराजपूर पोलिस ठाण्यांत काम करणाऱ्यांचा समावेश आहे. या पोलिसांचे मोबाइल कॉलच्या रेकॉर्डची तपासणी केली जात आहे. गुंड विकास दुबे याच्याशी या पोलिसांचा संबंध होता का, याचा शोध घेतला जात आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात चौबेपूर पोलिस ठाण्याचे १० पोलिस निलंबित करण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश पोलिस व एसटीएफची ५० पथकांनी विकास व त्याच्या साथीदाराचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. तत्पूर्वी कानपूरचे आयजी मोहित अग्रवाल म्हणाले, चौबेपूर ठाणे पूर्णपणे तपासाच्या कक्षेत आले आहे. चौबेपूर ठाण्यात पूर्वी काम करत असलेल्या पोलिसांचीही चौकशी केली जाणार आहे. या लोकांनी विकासला साथ दिल्याचा संशय आहे. दुसरीकडे प्रकरणाची चौकशी करणारे निरीक्षक के.के. शर्मा म्हणाले, घटनेच्या दिवशी सायंकाळी ४ च्या सुमारास विकासने फोनवरून पोलिसांना धमकी दिली होती. प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न कराल तर बिकरू गावात अनेकांची हत्या केली जाईल.
शहिदांचे नातेवाईक म्हणाले, डीआयजीदेव यांना हटवा
घटनेत शहीद झालेले सीआे देवेंद्र मिश्रा यांचे नातेवाईक कमलाकांत म्हणाले, एसटीएफ डीआयजी अनंद देव यांना तपास पथकांतून बाहेर काढले पाहिजे. एसएसपी असताना त्यांनी मिश्रा यांच्या पत्राकडे दुर्लक्ष केले होते. स्थानिक पोलिसांच्या कारवाईऐवजी पत्राला बनावट असल्याचा प्रयत्न केला. वास्तविक त्यामधील माहिती व पोलिस डायरीतील तपशील जुळत आहे. स्थानिक पातळीवर हे पत्र दडवतायेत.
ब्लॅक स्पॉट : राजधानीपासून लहान शहरापर्यंत गुन्हेगारांच्या टोळ्या
उत्तर प्रदेशात गुन्हेगारांचे अनेक अड्डे असल्याचे पाहायला मिळतात. हे ब्लॅक स्पॉट समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करतात. अनेक गोष्टींत लोक न्यायालयाऐवजी अशा गुन्हेगारांकडे जातात. एवढेच नव्हे तर अनेक आरोपी लोकप्रतिनिधी देखील बनले आहेत. गाझीपूर, मऊमध्ये मुख्तार अन्सारी, गोरखपूरच्या काही भागांत हरिशंकर तिवारी, महाराज गंजच्या काही भागांत तुरुंगात बंद अमरमणी त्रिपाठी, चंदौरीमध्ये विधान परिषद सदस्य बृजेश सिंह, प्रतापगडमध्ये रघुराज प्रताप, प्रयागराजमध्ये अतीश अहमद, अजय सिंह, खान मुबारक, देवरियात संजीव द्विवेदी इतर भागांतही अनेक गुंडांचे राज्य आहे. चंबळ व बुंदेलखंडमधील डाकूंचे वर्चस्व हळूहळू संपले आहे. परंतु शहरी व मैदानी भागांत गेल्या तीन दशकांत अनेक नव्या टोळ्या तयार झाल्या. हमीरपूरमध्ये अशोक चंदेल, फरुखाबादमध्ये विजय सिंहची टोळी कुख्यात आहे. हे लोक तुरुंगात राहून देखील वसुली करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.