आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक सरकारने राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवले नसल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी सोमवारपासून मोठे अभियान सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक म्हणाले, ८ मेपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे हटवावे यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. परंतु त्याबाबत कारवाई करण्यात आली नाही. श्रीराम सेनेचे प्रमुख सिद्धालिंगा स्वामी म्हणाले, कर्नाटकच्या एक हजार मंदिरांत भोंगे लावण्यात आले आहेत.
सोमवारी या मंदिरांतून पहाटे चार वाजल्यापासून हनुमान चालिसा लावला जाईल. हनुमान चालिसा पाठ व सुप्रभात भोंग्यांवरून लावू देण्याबाबतचा निर्णय प्रशासन करेल. मशिदींच्या अजानपर्यंत हे पाठ लावले जातील. सोमवारच्या अभियानानंतरही भोंगे हटवण्यात आले नाही तर राज्यातील इतर मंदिरांतही भोंगे लावले जातील. पोलिस प्रशासन मंदिरातील भोंगे लावण्यावर काही कारवाई करणार असल्यास त्याचा सामना करण्यास आमची संघटना सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. परंतु राज्य सरकारने त्यावर काहीही कारवाई केलेली नाही. म्हणूनच आता आम्ही आमच्या बाजूने कारवाई करण्यास स्वतंत्र आहोत. भांेग्यांवरून राज्यात दोन पक्षांत तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भोंगे लावण्यात आलेल्या एक हजार मंदिरांबाहेर अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्यभरात पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व पोलिस ठाण्यांनाही तशा सूचना आहेत.
कर्नाटकात हिजाब वाद, बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येनंतर श्रीराम सेना व बजरंग दलाकडून मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा लावून धरण्यात आला आहे.
भोंग्यांबाबत कर्नाटकच्या ६०० मशिदींना नोटिसा
राज्य सरकारने भोंग्यांबाबत राज्यातील मशिदींना नोटिसा पाठवल्या आहेत. मशिदींवरील भोंग्यांच्या प्रश्नांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशापूर्वीच राज्य सरकारने २५० मशिदींना नोटीस पाठवली. कोर्टाच्या आदेशानंतर इतर ३५० मशिदींना नोटीस पाठवली आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजावरून ही नोटीस पाठवण्यात आली होती. सायलेंट झोनमधील मशिदींच्या भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा ५० डेसिबल, रहिवासी भागात ५५ डेसिबल, आैद्योगिक भागात ७५ डेसिबल आहे. श्रीराम सेना व बजरंग दलाच्या अभियाना आधीच मशिदींवरील भोंग्यांचा आवाज निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती, असे सरकारने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.