आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज देशभरात हनुमान जयंती साजरी होत आहे. सकाळपासूनच भाविक मंदिरांमध्ये पोहोचू लागले आहेत. अनेक राज्यांत मिरवणुका काढल्या जातील. गेल्या आठवड्यात रामनवमीला झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या राज्यांमध्ये बंगाल, बिहार तसेच दिल्लीचा समावेश आहे, जिथे गेल्या वर्षी जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीला हिंसाचार झाला होता. बंगालच्या हुगळीत यापूर्वी झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना पाहता, पोलिसांनी परिसरातील वातावरणाचा आढावा घेण्यासाठी रात्री फ्लॅग मार्च काढला.
दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरीत मिरवणूकीची दिली परवानगी
दिल्ली पोलिसांनी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि इतर हिंदू संघटनांना जहांगीरपुरीमध्ये मिरवणूक काढण्याची परवानगी दिली आहे. पोलिसांनी दोन मिरवणुका काढण्यास परवानगी दिली आहे. एक मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरू होईल, दुसरी मिरवणूक दुपारी 2-3 वाजता दिवसभरात काढण्यात येईल. पोलिसांनी मार्ग निश्चित केला असून संघटनांना कायद्याच्या कक्षेत राहून यात्रा काढण्यास सांगितले आहे.
बुधवारी जहांगीरपुरी परिसरात मिरवणूक काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलिसांनी त्यामागे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता. गेल्या वर्षी 16 एप्रिलला हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आज 2 मिरवणुका काढल्या जाणार आहेत. आयोजकांशी चर्चा केली. पोलिसांनी सांगितलेल्या मार्गावरूनच मिरवणुक काढली जाईल.
केंद्राची राज्यांसाठी अॅडव्हायझरी- प्रत्येक गोष्टीवर ठेवा लक्ष
गेल्या आठवड्यात रावनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराची दखल घेत गृह मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांना एक सल्लागार जारी केला. हनुमान जयंतीला शांतता नांदण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, असे मंत्रालयाने म्हटले आहे. जातीय सलोखा बिघडवण्याची क्षमता असलेल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा.
हे ही वाचा
हनुमान जयंतीवर केंद्राचा राज्यांना सल्ला:वातावरण खराब करणाऱ्यांवर लक्ष ठेवा
देशातील अनेक राज्यांमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर गृह मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांसाठी एक सूचना जारी केली आहे. हनुमान जयंतीला शांतता नांदण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, असे मंत्रालयाने म्हटले आहे. जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांवर व त्यासंबंधित प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवा. असे आदेशात म्हटले आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.