आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Happy New Year 2021, Keep The Experience ... Every Opportunity Will Be A Success

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी वर्ष नवी पहाट:अनुभव जपून ठेवा...प्रत्येक संधी यश बनेल, वर्ष बदलले आहे; आता आपल्याला काळ बदलायचा आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपण नववर्षासोबत नव्या दशकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत... वेदनेची नदी ओलांडताना मिळालेला धडा दिलासादायक मार्ग दाखवेल

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नववर्षासोबत नवीन दशकाच्या उंबरठ्यावर पहिले पाऊल ठेवताना आज आपले हात प्रार्थनेच्या मुद्रेत आहेत. कारण, आपण सर्व वेदनेची खोल नदी पार करत २०२१ च्या नव्या वर्षात आणि नव्या दशकात पोहोचलो आहोत. मात्र, त्याचबरोबर आपणाला ही जाणीव असली पाहिजे की, त्या अवघड काळातही सरत्या वर्षाने शांततेत क्षणा-क्षणाचे मोलही समजावले आणि आयुष्यातील प्रत्येक पैलू परिपूर्ण अनुभवाचा दिला. अनुभवाच्या या अनमोल वारशासह २०२१ मध्ये प्रवेश करताना आता भारत अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षणापासून सामाजिक आरोग्यापर्यंत जगभरात आपली क्षमता सिद्ध करण्यास तयार आहे. सर्वात कठीण काळाची शिकवण विसरू नये. संधींचे आकाश त्याच्याच मुठीत असते, याचा इतिहास साक्षीदार आहे. नववर्ष अापल्यासोबत अनेक संधी आणेल. गतकाळातील अनुभवांचा धडा घेतल्यावरच अशा संधींचे यशात रूपांतर करू शकू. आपल्यासाठी हा आरोग्याचा असो, बचतीचा असो... याची आठवण कायम ठेवा. ही वेळ केवळ पुढे जाण्याची नव्हे तर सर्वांना सोबत घेऊन पुढे सरसावण्याची आहे. चला! वचन देऊ की, संयम, सहकार्य आणि दया यासारख्या मानवी गुणांचे भांडवल गेल्या वर्षाने आपल्याला दिले आहे. ते २०२१ व या दशकात आणखी वृद्धिंगत करू

अनंत अमुची ध्येयासक्तीमार्ग ना आमुचा रोधू शकती ना धन, ना दारा घराची वा वितभर कारामानवतेचे निशाण मिरवू महासागरात जिंकुनी खंड खंड सारा!चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!’– कुसुमाग्रज

आशेचे चित्र : २०२१ मधील हे स्वप्न १५ वर्षांच्या मुलाचे अाहे... त्यावर मुलांप्रमाणेच नितांत विश्वास ठेवा, नक्की साकार हाेईल

बातम्या आणखी आहेत...