आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Haqqani Network, US Claims Taliban Organization Is Different; News And Live Updates

तालिबानचे राज्य:हक्कानी नेटवर्क, तालिबान संघटना वेगवेगळ्या असल्याचा अमेरिकी दावा; अतिरेक्यांच्या यादीत सामील हक्कानीविषयी अजून गूढ कायम

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबान-जैशच्या दहशतवाद्यांची भेट

तालिबान व बंदी असलेल्या हक्कानी नेटवर्क यांच्यात मजबूत संबंध दिसत असतानाही दोन्ही संघटना वेगवेगळ्या असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. काबूल विमानतळाच्या सुरक्षेबद्दल तालिबानला माहिती दिली जात आहे का? हीच माहिती हक्कानी नेटवर्कलाही देणार आहात का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले, तालिबान व हक्कानी नेटवर्क या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत. अमेरिकेने दोन्ही संघटना एक नसल्याचे म्हटले असले तरी दोन कट्टरवादी संघटनांत मजबूत संबंध दिसून येतात.

अमेरिकेने पहिल्यांदा २०१२ मध्ये हक्कानी नेटवर्कला दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले होते. नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरच्या म्हणण्यानुसार हक्कानी नेटवर्क अमेरिका, सहकारी देश व अफगाणी दलांना लक्ष्य करणारी सर्वात घातक संघटना आहे. त्यामुळेच हक्कानीला दहशतवादी संघटना मानले जात होते. ही संघटना अमेरिकन सैन्य व लोकांवर हल्ले करतात. हक्कानीचे तालिबान व अल-कायदाशी संबंध आहेत. पाक नागरिक खलील हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या आहे. खलील काबूलमध्ये नवा सुरक्षा प्रमुख आहे.

तालिबानशी जुने संबंध
सीआयएचे माजी दहशतवाद प्रतिबंधक प्रमुख डग्लस म्हणाले, पाकिस्तानी व हक्कानी नेटवर्कमधील संबंध तालिबानच्या विजयासाठी अपरिहार्य होते. वास्तविक तालिबान, हक्कानी नेटवर्क व अल-कायदाची खोलवर मुळे पसरली आहेत. तालिबानने हक्कानी नेटवर्कचे नेते व दहशतवाद्यांना अल-कायदासोबत कारवायांत सामील केले.

आत्मघाती हल्लेखोराकडे २५ पौंड स्फोटके
काबूल विमानतळावरील स्फोटानंतर आता अमेरिका कटाचे धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. काबूल विमानतळावरील हल्ल्यासंबंधी इशाऱ्यानंतर सैनिक सतर्क होते. बाहेर तैनात तालिबानी दहशतवादी गर्दीला दूर करत होते. परंतु गर्दी पुन्हा येत होती. असे दोन वेळा घडले. परंतु तिसऱ्यांदा गर्दीसोबत हल्लेखोरही आला. त्याने शरीरावर २५ पौंड स्फोटकांचे जॅकेट घातलेले होते. ऐबी गेटवर अमेरिकन सैन्याच्या जवळ पोहोचताच त्याने सायंकाळी ५.४८ मिनिटांस स्वत: ला उडवून दिले. हल्लेखोर ऐबी गेटपर्यंत कसा पोहोचला, हा प्रश्न निर्माण होतो. त्याला कोणी मदत केली होती का?

तालिबान-जैशच्या दहशतवाद्यांची भेट
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वर्चस्वानंतर समान विचारसरणीचे गट एकत्र येत आहेत. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमदने ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात कंदहारमध्ये तालिबान संघटनेच्या म्होरक्यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. जैशने भारतातील आपल्या कारवायांसाठी तालिबानचे समर्थन मागितले आहे. भारताच्या गुप्तचर संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सीमेवरील कारवायांत वाढ होण्याची शक्यता आहे. तालिबान व जैश दोन्हीही कट्टरवादी मानले जातात. काबूलवरील वर्चस्वानंतर जैशच्या दहशतवाद्यांची अफगाणिस्तानातील तुरुंगातून सुटका झाली होती. ते भारतावर हल्ल्याचा कट करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...