आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबचे राज्यसभा सदस्य तथा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या नावाने काही जणांनी ऑनलाइन फसवणूक सुरू केली आहे. हे आरोपी सोशल मीडियावर हरभजन सिंग भज्जी नावाने बोगस अकाउंट उघडून लोकांकडून पैसे मागत आहेत. या प्रकरणी इंस्टाग्रामवर एक बोगस अकाउंट उघडण्यात आले आहे. त्यावर भज्जीचे ऑडिओ मेसेज टाकले जात आहेत.
भज्जीने ट्विटद्वारे दिली बोगस अकाउंटची माहिती
क्रिकेटपटू हरभजन सिंगने या फेक अकाउंटची माहिती मिळताच त्याची कठोर दखल घेतली. त्याने लगेचच आपल्या ट्विटर हँडलवर यासंबंधीचा एक मेसेज टाकला. तो म्हणाला - 'फेक अकाउंटपासून सावध राहा, कोणी तुम्हाला हरभजन 3 वरून मेसेज करून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर त्याला प्रतिसाद देऊ नका. तो तुम्हाला पैसे मागेल. हे बोगस खाते आहे.'
हरभजनने आपल्या ट्विटच्या शेवटी लिहिले की, 'हे त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट नाही. भज्जीने या बनावट सोशल मीडिया अकाउंटची तक्रार सायबर गुन्हे शाखेकडेही केली आहे.'
हरभजन सिंगशी संबंधित खालील बातमी वाचा...
आशिया कपसाठी हरभजनचे मोठे वक्तव्य:म्हणाला- आपले सरकार योग्य निर्णय घेत आहे, आपले पहिले प्राधान्य आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेला
आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदावरून अजूनही गदारोळ सुरू आहे. या वेळी आशिया चषक कुठे होणार हे अद्याप दोन्ही मंडळांना ठरवता आलेले नाही, राजकीय कारणांमुळे भारताला पाकिस्तानात जाऊन आशिया चषक खेळायचा नाही. त्याचबरोबर पाकिस्तान बोर्ड भारताच्या निर्णयावर नाराज आहे. दोन मंडळांमध्ये यावर वादविवादही झाला आहे. त्याचवेळी, आता हरभजन सिंगने आशिया चषकाच्या यजमानपदावर आपले मत मांडले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.