आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hardeep Singh Puri Tweet Citizenship Amendment Act CAA Necessary Afghanistan Sikhs Hindus; News And Live Updates

अफगाण संकटावर केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य:शेजारील देशात अल्पसंख्याकांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते, त्यामुळे CAA कायदा लागू करणे किती गरजेचे हे समजते?

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात पोहोचल्यानंतर भावूक झाले अफगाणी खासदार

अफगाणिस्तान सध्या मोठ्या संकटातून जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि गॅस मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी अफगाणिस्तान संकटाचा संदर्भ देत नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आवश्यक असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन ट्विट करत ही माहिती दिली आहे. शेजारील देशात ज्या प्रकारे शीख आणि हिंदूंना वागणूक दिली जात आहे. त्यामुळे CAA कायदा किती आवश्यक आहे हे दिसून येत असं ट्विटमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या कायदाविरोधात देशभरात डिसेंबर 2019 मध्ये याविरोधात मोठे आंदोलन सुरु झाले होते.

सीएएमुळे देशाच्या धर्मनिरपेक्ष विश्वासार्हतेवर परिणाम होणार नाही असे पुरी यांनी म्हटले होते. विरोधी पक्ष नवीन कायद्याबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. दरम्यान, विरोधी पक्ष सुधारित कायद्याचा वापर करत सरकारविरोधी मोहीम चालवत आहे. ज्यामध्ये चुकीची माहिती पसरवणे, देशविरोधी शक्तींना एकत्र करणे आणि हिंसा भडकवणे असे अनेक आरोप त्यांनी आपल्या ट्विटवरुन केले होते.

काबूलमधून भारतीयांचे निर्वासन सुरूच
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर काबूलमधून भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच आहे. दरम्यान, रविवारी 3 विमान्यांनी 390 लोक भारतात पोहोचले. यामध्ये 239 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानाने 168 लोकांना भारतात आणले. ज्यात 107 भारतीय आणि 23 अफगाण शीख आणि हिंदू यांचा समावेश होता. यापूर्वी 87 भारतीय आणि 2 नेपाळींना एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले होते.

भारतात पोहोचल्यानंतर भावूक झाले अफगाणी खासदार
भारतीय हवाई दलाचे विमान हिंडन एअरबेसवर उतरल्यानंतर नरेंद्र सिंह खालसा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दरम्यान, अफगाणिस्तानच्या उल्लेखाने त्याच्या डोळ्यात अश्रू आले. "मी रडत आहे. 20 वर्षांत आम्ही जे काही केले ते सर्व संपले." असे नरेंद्र सिंह खालसा भरलेल्या डोळ्यांनी म्हणत होता. विशेष म्हणजे नरेंद्र सिंह खालसा भारतीय वशांचे अफगाणी खासदार आहेत.

5 दिवसात 2000 लोकांनी कॉलवर मागितली मदत
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या अफगाण स्पेशल सेलमध्ये 5 दिवसात 2000 पेक्षा जास्त कॉल आले आहेत. विशेष म्हणजे या काळात मंत्रालयाने व्हॉट्सअॅपवर 6000 हजार तर ई-मेलद्वारे 1200 पेक्षा जास्त लोकांच्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...