आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क:म्हणाले - 'आप'ला 1 जागाही मिळणार नाही, तर भाजपला 150 जागा मिळतील

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. यावेळी भाजप नेते हार्दिक पटेल यांनी मतदानाचा हक्का बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना लोक विकासाला मतदान करतील. गेल्या 10 वर्षांपासून या विधानसभा मतदारसंघात कोणताही विकास झालेला नाही, असे हार्दिक पटेल म्हणाले.

.अहमदाबादच्या विरमगाम मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवणारा हार्दिक पटेल म्हणाले, "सोशल मीडियावर माझ्याविरोधात पोस्टर लागले आहेत. पण पाटीदार आंदोलनाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाले. कारण काँग्रेस आणि आपच्या मतदारांनी मतदान केले नाही. भाजपला 150 जागा मिळतील, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 93 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी निवडणूक आयोगाने आवाहन करून मोठ्या संख्येने मतदान करावे, असे सांगितले.

गुजरात विधानसभा निवडणुकीशी संबंधित दिव्य मराठीच्या या खास बातम्या वाचा...

गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 63.31% मतदान: हा आकडा गेल्या वेळेपेक्षा 5.49% कमी आहे.

सौराष्ट्र-कच्छमध्ये केवळ 42 टक्के मतदान झाले. त्याचवेळी दक्षिण गुजरातमध्ये 56 टक्के मतदान झाले आहे. अशाप्रकारे दक्षिण गुजरातच्या तुलनेत सौराष्ट्रात 14 टक्के कमी मतदान झाले आहे. येथील 12 जिल्ह्यांपैकी केवळ मोरबीमध्ये 53.75% मतदान झाले. उर्वरित जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 50% पेक्षा कमी मतदान झाले आहे. त्यामुळे पाटीदार मतदारसंघात कमी मतदान झाल्याने उमेदवार चिंतेत पडले आहेत. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधानांच्या आई हीराबेन यांनी मतदानाचा हक्क बजावला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांनी #GujaratAssemblyPolls च्या दुसऱ्या टप्प्यासाठी गांधीनगर येथे मतदान केले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात राज्यातील 14 जिल्ह्यांतील 93 जागांसाठी सोमवारी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...