आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. पाटीदार आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या दंगली आणि जाळपोळप्रकरणी अपिलावर निर्णय होईपर्यंत काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, संबंधित उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती द्यायला हवी होती.
लोकसभा निवडणूक लढवू शकले नाही हार्दिक
पाटीदार आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी हार्दिक पटेल यांना गुजरात उच्च न्यायालयाने दोषी ठरवले होते. हार्दिक सध्या याच प्रकरणात जामिनावर बाहेर आहे. पण, दोषी असल्याने हार्दिक पटेल यांना कोणतीही निवडणूक लढवता आली नाही. यानंतर हार्दिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीचा हवाला देत लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिल्याने हार्दिक यांना लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती.
गुजरात सरकारने 10 खटले मागे घेतले
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला गुजरात सरकारने पाटीदार आरक्षण आंदोलनासंदर्भात दाखल झालेले 10 खटले मागे घेतले होते. सरकारी वकील सुधीर ब्रह्मभट्ट यांनी यावेळी सांगितले की, राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार खटले मागे घेण्यासाठी विविध न्यायालयात अर्ज सादर करण्यात आले होते. अहमदाबाद येथील सत्र न्यायालयाने सात खटले मागे घेण्याची परवानगी दिली होती.
निकालानंतर हार्दिक पटेल यांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हार्दिक पटेल यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. केवळ निवडणूक लढवणे एवढेच आपले उद्दिष्ट नाही, तर गुजरातच्या जनतेची ताकदीने सेवा करायची आहे, असे ते म्हणाले. तीन वर्षांपूर्वी खोट्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याचे ते म्हणाले. त्याबद्दल मी उच्च न्यायालयाचे आभार मानतो. यासोबतच हार्दिक पटेल यांनी निवडणूक लढवण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.
2015 मध्ये आंदोलनादरम्यान झाला होता हिंसाचार
गुजरातमध्ये 23 जुलै 2015 रोजी पाटीदार आरक्षण आंदोलन सुरू झाले. या आंदोलनादरम्यान अहमदाबादमध्ये मोठी रॅली काढण्यात आली. पाटीदार नेते हार्दिक पटेल, लालजी पटेल आणि एके पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. यादरम्यान अहमदाबादपासून सुरू झालेल्या हिंसाचाराने संपूर्ण गुजरात ग्रासला होता. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 14 पाटीदार तरुणांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिक, लालजी आणि एके यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.