आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Haridwar Kumbh Mela 2021 Registration Is Mandatory, Consider Testing The Corona Before Admission

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरिद्वार कुंभमेळा:2021 मध्ये चारऐवजी दोन महिन्यांचेच आयोजन; नोंदणी अनिवार्य, प्रवेशाआधी कोरोना चाचणी करण्याबाबत विचार

हरिद्वार | मनमीत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुंभमेळ्यात वर्ष 2010 मध्ये आले होते 1.6 कोटी लोक, या वेळी जास्त भाविक येण्याची अपेक्षा

१२ वर्षांनी होणारा हरिद्वार कुंभमेळा यंदा ११ वर्षांनंतर म्हणजे २०२१ मध्ये होणार आहे. मेष राशीत सूर्य, कुंभ राशीत गुरू आल्यावर कुंभमेळा होतो. २०२२ मध्ये गुरू कुंभ राशीत राहणार नाही. त्यामुळे या वेळी कुंभमेळा एक वर्ष आधीच होत आहे. त्यात दोन आव्हाने आहेत. पहिले, सर्व बांधकामे लवकर पूर्ण करणे. दुसरे, कोविड काळातील हा पहिला मोठा धार्मिक कार्यक्रम असेल. त्यामुळे त्याचा अवधी चारवरून घटवून दोन महिने केला आहे. आता तो ११ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत असेल. सामान्यत: कुंभमेळा १४ जानेवारीपासून सुरू होतो. कामे वेळेत पूर्ण होतील, असे मेळ्याचे प्रभारी दीपक रावत यांनी सांगितले.

पहिल्यांदाच शाही स्नानात फक्त निवडक संतच सहभागी होतील
- फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून स्नान : फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून भाविकांचे स्नान व्हावे यासाठी सामान्य घाटांसह प्रथमच नैसर्गिक घाटांचा वापर होईल. प्लास्टिकपासून तयार केलेल्या या घाटांवर डीप वॉटर बॅरिकेडिंग केले जात आहे. आतापर्यंत बाहेरचे भाविक ५० पेक्षा जास्त घाटांवर स्नान करत होते. यंदा कालव्यांच्या घाटांवरही स्नान होईल. पहिल्यांदाच शाही स्नानात निवडक संतच सहभागी होतील.

- प्रवेशाआधी नोंदणी, अँटिजन टेस्टचीही शक्यता : प्रथमच भाविकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. मेळ्यात प्रवेशाआधी अँटिजन टेस्ट करण्याबाबत विचार सुरू आहे. तसे झाल्यास गंगेत स्नानाआधी कोविड-१९ निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल.

- तात्पुरते पूल कमी : कुंभमेळा भागात गेल्या वेळी १८ ठिकाणी ३२ तात्पुरते पूल बनवले होते. यंदा ३ ठिकाणी ५ तात्पुरते पूल असतील.

कुंभमेळ्याआधी तयार होणार चारधाम मार्ग
केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले की, चारधाम यात्रा मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. यमुनोत्री मार्ग ग्रीन झोनमध्ये येतो, तो संवेदनशील झोन आहे. कोरोनामुळे कामाला विलंब झाला आहे. मात्र, आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. काम वेगाने सुरू आहे. कुंभमेळ्याआधी काम पूर्ण व्हावे, असा मंत्रालयाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना सहजपणे चारधाम यात्राही करता येईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser