आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक दशरथ मांझी:तरुणपणी डाेंगराला खाेदण्यास सुरुवात करून 30 वर्षांत बनवला 3 किमी रस्ता, ओडिशाचे हरिहर यांचे प्रयत्न यशस्वी

नयागड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशाच्या नयागड जिल्ह्यात राहणारे हरिहर यांनी आपल्या तुलुबी या गावासाठी ३० वर्षांत डाेंगर खाेदून रस्ता तयार केला. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली हाेती. जंगल क्षेत्रातील डाेंगराळ भागातून मार्ग काढून ताे मुख्य रस्त्याला जाेडण्याची ही मागणी हाेती. बसला सहजपणे ये-जा करता यावी असा मार्ग तयार व्हावा असे ग्रामस्थांना वाटत हाेते. कारण असा रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांचे हाल हाेत हाेते. प्रशासनाने या विनंतीकडे दुर्लक्ष केले. तत्कालीन मंत्र्यांनी देखील हे अशक्य असल्याचे सांगून टाकले हाेते. प्रशासनाची मनाई असतानाही हरिहर यांनी रस्ता बनवला. हरिहर बेहरा व त्यांचे बंधू कृष्ण यांनी गावाची गरज लक्षात घेऊन रस्ता तयार करण्याचा निर्धार केला. भावांकडे तेव्हा हाताेडा, कुदळ असे साहित्य हाेते. रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा हरिहर २५-२६ वर्षांचे हाेते. या दरम्यान त्यांनी भावाला गमावले.

नातेवाईक जंगलात बेपत्ता व्हायचे : हरिहर
आमच्या गावाला जवळच्या शहराशी संपर्क ठेवण्यासाठी साेयीचा मार्ग नव्हता. नातेवाईक गावात येत. परंतु येताना किंवा जाताना रस्ता चुकत. अनेकवेळा जंगलात बेपत्ता हाेत. प्रशासनाने ३० वर्षांपूर्वीच एेकायला हवे हाेते. मी भावासाेबत शेतीचे काम साेडून रस्ता तयार करण्यावर लक्ष दिले. या कामात इतर गावकऱ्यांनी देखील मदत केल्याचे हरिहर यांनी सांगितले. गावकरी दाेन्ही भावांबद्दल आभार व्यक्त करतात.

बातम्या आणखी आहेत...