आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकच्या शिवमोगा येथे हत्या करण्यात आलेल्या बजरंग दल कार्यकर्ता हर्षचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ, हर्षवर वार झाल्यानंतर मृत्यूपूर्वीचा आहे. या व्हिडिओ हर्ष हा रक्तबंबांळ अवस्थेत दिसत आहे. त्याच्या शरीराची देखील हालचाल होताना स्पष्टपणे दिसत आहे. मात्र या 17 सेकेंदाच्या व्हिडिओला आवाज नाही. हा व्हिडिओ कोणी रिकॉर्ड करुन सोशल मीडियावर अपलोड केला. याची माहिती अद्याप भेटू शकलेली नाही. हर्षचा व्हिडिओ अनेक सोशल मीडियावर शेअर करत, त्यासाठी न्याय मागत आहे.
दरम्यान हर्षच्या हत्येचा थेट कनेक्शन हिजाब वादावर लावला जात आहे. मात्र, हर्षच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले की, हर्षने काही महिन्यांपूर्वीच बजरंग दल सोडले होते. पण भाजपने त्याला दुजोरा देत म्हटले आहे की, हर्ष हा भाजपचा कार्यकर्ता होता.
हर्षने फेसबुकवर हिजाबच्या वादासंदर्भात अनेक पोस्ट केल्या होत्या
हर्षने नुकतेच सोशल मीडियावर देशात सुरू असलेल्या हिजाब वादासंदर्भात अनेक पोस्ट केल्या होत्या. त्यात एका पोस्टमध्ये हर्षने शिवमोगाच्या सह्याद्री कॉलेजसमोर हिजाब विरोधात भगवा उपरना अंगावर घालून एक फोटो पोस्ट केला होता. त्या पोस्टमध्ये हर्षने लिहले होते की, शिवमोगा शहरातील सह्याद्री कॉलेजमध्ये केसरी! ही पोस्ट हर्षने 7 फेब्रुवारी रोजी केली होती. हर्षने 7 फेब्रुवारीला आणखी एक पोस्ट केली होती त्यात लिहले होते की, शिवमोगा येथे कोरोनाच्या लाटेपेक्षाही भगव्याची लहर मोठी आहे.
तीन आरोपींना पोलिसांनी पकडले
पोलिसांनी हर्षच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी त्यांची ओळख सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर शिवमोगामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक भागात आक्रमक आंदोलकांनी वाहन्यांनी तोडफोड करत वाहने पेटवल्याची घटना घडली आहे. शहारात तणावाचे वातावरण असल्याने शहरात कलम 144 लागू करण्यात आली आहे. तसेच दोन दिवस शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बासवराज बोम्मई यांनी रविवारी सांगितले होते की, हर्षची चाकूने हत्याने करण्यात आली आहे. या प्रकरणी काल रात्रीपासून पोलिस तपास करत आहे.
शाळा, महाविद्यालये दोन दिवस बंद
राज्याचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी हत्या झालेल्या हर्षच्या कुटुंबियांची भेट घेतली. तेव्हा ते म्हणाले की, 4-5 जणांनी मिळून 26 वर्षाच्या हर्षची हत्या केली आहे. या घटनेमागे कोणत्या संघटनेचा कट होता. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शाळा, महाविद्यालये दोन दिवस बंद करण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.