आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Harsh Vardhan, Coronavirus Covid 19 Vaccination Dry Run In 736 Districts Of 33 States

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीनेशनपूर्वी रिहर्सल:33 राज्यातील 736 जिल्ह्यांमध्ये ड्राय रन, आरोग्य मंत्री म्हणाले- पुढील काही दिवसात देशभर लसीकरणाला सुरुवात होईल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन ड्राय रनचा आढावा घेण्यासाठी तमिळनाडूमध्ये गेले होते. चेन्नईतील हॉस्पीटलमध्ये ते एका लहान मुलाला मास्क घालण्यासाठी मदत करताना दिसले. - Divya Marathi
आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन ड्राय रनचा आढावा घेण्यासाठी तमिळनाडूमध्ये गेले होते. चेन्नईतील हॉस्पीटलमध्ये ते एका लहान मुलाला मास्क घालण्यासाठी मदत करताना दिसले.
  • 2 जानेवारीला झाले होता पहिला ड्राय रन

केंद्र सरकारने दोन कंपन्यांना व्हॅक्सीनच्या आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. दरम्यान, या लसीकरणापूर्वी 33 राज्यातील 736 जिल्ह्यांमध्ये लसीकरणाच्या ड्राय रनची दुसरी फेज सुरू आहे. खऱ्या लसीकरणात कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे जाणून घेण्यासाठी हे ड्राय रन केले जात आहे. दरम्यान, या ड्राय रनचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आज तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पुढील काही दिवसात देसभर लसीकरणाला सुरूवात होईल.

कशाप्रकारे ड्राय रन सुरू आहे ?

  • ड्राय रनच्या प्रोसेसमध्ये व्हॅक्सीनेशनसोबतच चार स्टेप्स सामील आहेत. यात 1. बेनीफिशियरी (ज्या लोकांना डमी व्हॅक्सीन लावली जाईल) ची माहिती, 2. व्हॅक्सीनेशनसाठी निवडलेल्या जागेचे डिटेल्स, 3. जागेवर डॉक्यूमेंट्सचे व्हेरिफिकेशन आणि 4. व्हॅक्सीनेशनची मॉक ड्रिल आणि रिपोर्टिंगची माहिती अपलोड करणे.
  • ड्राय रनच्या लिस्टमध्ये सामील लोकांना डमी व्हॅक्सीन दिली जात आहे. यावेळी, लसीकरण सुरू करण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्थांचा आढावा घेण्यात येत आहे.
  • प्रत्येक सेंटरवर तीन रुम बनवण्यात येत आहेत. पहिली रुम वेटिंगसाठी असेल. यात या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. दुसऱ्या रुममध्ये व्हॅक्सीन दिली जात आहे आणि तिसऱ्या रुममध्ये व्हॅक्सीन दिल्यानंतर 30 मिनीटे ऑबजवेशनमध्ये ठेवले जाईल.

2 जानेवारीला झाले होता पहिला ड्राय रन

मागच्या आठवड्यात 125 जिल्ह्यातील 285 सेंटर्सवर पहिल्या फेजचा ड्राय रन झाला होता. बहुतेक राज्यात ही रिहर्सल ठीक राहिली. काही ठिकाणी अडचणी आल्या, पण येणाऱ्या काळात त्या ठीक केल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...