आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते तर संसदेत दारू पिऊन यायचे...शहा हसले:पंजाब CM मान यांच्यावर हरसिमरत कौर यांचा आरोप; म्हणाल्या- ते दारू पिऊन राज्य चालवतात

अमृतसर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील भटिंडा येथील शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर-बादल यांनी मंगळवारी लोकसभेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशभरातील ड्रग्सच्या समस्या आणि सरकारने उचललेल्या पावलांवर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. यावेळी पंजाबमधील ड्रग्जच्या स्थितीवर हरसिमरत कौर बादल यांनी मान यांना घेरले.

ड्रिंक करूनच राज्यसरकार चालविले जाते

त्या म्हणाल्या की, 6 महिन्यांपूर्वी आमचे पंजाबचे मुख्यमंत्री सदनातील त्या कोपऱ्यात बसायचे. जे संसदेत सकाळी 11 वाजता दारू पिऊन येत असत. तेच आज पंजाब राज्य चालवत आहे. 11 वाजता ते संसदेच्या सदनात येताना काय खाऊन-पिऊन येत होते. त्यांच्या शेजारी बसणारे सदस्य देखील आपली जागा बदलण्याची मागणी करित असत. ते बोलत असताना सर्वत्र वास येत असे. पंजाबमधील विविध मार्गांवर लिहले आहे की, 'डोन्ट ड्रिंक अॅंण्ड ड्राईव्ह'. पण पंजाबमध्ये ड्रिंक करूनच राज्यसरकार चालविले जात आहेत. ही बिकट परिस्थिती पंजाबमध्ये झालेली आहे.

अमित शहासह सभागृहातील सदस्य हासले

त्यानंतर हरसिमरत कौर-बादल यांनी अरविंद केजरीवाल यांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या की, पंजाब निवडणूक जिंकण्यासाठी मान यांनी आईला शपथ दिली की, मी दारूला हात देखील लावणार नाही. केजरीवाल म्हणाले होते की, भगवंत मान यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. साहेब, त्याग देऊन मुख्यमंत्री झाले. पण गेल्या 10 महिन्यांत आपल्या पंजाबची अवस्था पुन्हा बिकट झाली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे, बादल यांच्या बोलण्यावर गृहमंत्री अमित शहा यांनाही हसू आवरता आले नाही. जोपर्यंत बादल भगवंत मानांवर बोलत होते, तोपर्यंत सभागृहात सर्वत्र हशा पिकला होता.

बातम्या आणखी आहेत...