आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Haryana: Agricultural Laws, Farmers Mahapanchayat, Kisan Mahapanchayat At Kandela Of Jind

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापंचायतीत अपघात:कंडेला गावात सुरू असलेल्या महापंचायतीचे व्यासपीठ कोसळले, राकेश टिकैतसह अनेक शेतकरी नेते जखमी

जींदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जींदजवळील कंडेलामध्ये सुरू असलेल्या महापंचायतीत अपघात झाला. ज्या व्यासपीठावरुन शेतकरी नेते राकेश टिकैत शेतकऱ्यांना संबोधित करत होते, ते व्यासपीठ अचानक कोसळले. यावेळी मंचावर राकेश टिकैतसह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते. अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

राकेश टिकैत त्यांच्या भाषणासाठी मोठी गर्दी

अपघातापुर्वी महापंचायतीला संबोधित करताना राकेश टिकैत म्हणाले की, सरकारची घेराबंदी एक नमुना आहे. येणाऱ्या काळात अशाप्रकारेच गरीबाच्या अन्नावर घेराबंदी होईल. अन्न तिजोरीत बंद होऊ नये, यासाठीच हे आंदोलन सुरू झाले आहे. सध्या सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. पुढील परिस्थिती पाहून शेतकरी दिशा ठरवतील. स्वतःवर गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल झाल्याबद्दल टीकैत म्हणाले की, 'आंदोलन सुरू असेपर्यंत आंदोलन करेल, नंतर तुरुंगात जाईल.'

मीडियाकडून लाल किल्यासंबंधी प्रश्न विचारल्यावर टीकैत म्हणाले की, हा सर्व सरकारचा कट होता. आम्ही मागील 35 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करत आहोत. आम्ही कधीच लाल किल्यावर जाण्याबाबत विधान केले नाही. 26 जानेवारीला लाल किल्यावर गेलेले शेतकरी नव्हते, ते सर्व सरकारने रचलेला कट होता.

कंडेलामध्ये झालेल्या महापंचायतीत 5 प्रस्ताव ठरले

  1. तिन्ही केंद्रीय कृषी कायदे रद्द केले जावेत.
  2. एमएसपीवर कायदा व्हावा.
  3. स्वामीनाथन आयोग लागू केला जावा.
  4. शेतकऱ्यांचे कर्म माफ करण्यात यावेत.
  5. 26 जानेवारीला पकडलेल्या शेतकऱ्यांना सोडण्यात यावे आणि त्यांच्यावरील गुन्हे माघे घ्यावेत.
बातम्या आणखी आहेत...