आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबसस्थानकासमोर धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. हरियाणाच्या भिवनीतील बवानी खेडामध्ये ही घटना घडली. सुदैवाने गाडीत बसलेल्या चालकाचा जीव थोडक्यात वाचला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कारमध्ये आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे.
चरखी दादरी येथे राहणारे हितेश कुमार हे रविवारी रात्री बवानी खेडा येथून हिसारला जात होते. यावेळी बसस्थानकासमोर गाडी पोहचताच कारने अचानक पेट घेतला. गाडीला आग लागताच हितेश कुमार गाडीतून बाहेर पडले.
हितेश कुमार गाडीतून बाहेर पडताच आगीचा एकदम मोठा भडका उडाला. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्ने केला. पण, यश आले नाही. बघता-बघता पुर्ण गाडी जळून खाक झाली.
ऋषभ पंतचा कार अपघात
25 वर्षीय क्रिकेटपटू ऋषभ पंत शुक्रवारी सकाळी एका रस्ता अपघातात थोडक्यात बचावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपेमुळे हा अपघात झाला. त्याची मर्सिडीज नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली, त्यानंतर तिला आग लागली आणि ती उलटली. अपघातानंतर खिडकी तोडून पंत जळत्या कारमधून बाहेर पडला. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
आम्ही झोपेत होतो, अचानक अख्खी बस पेटली
'आम्ही सर्व गाढ झोपेत होतो. अचानक बसची भीषण टक्कर झाल्याचे जाणवले. त्यामुळे सीटवरुन खाली कोसळले. समोर पाहते तर बसच्या पुढील भागाला आगीने वेढले होते. खिडकीतून उडी मारत कसाबसा जीव वाचवला.' नाशिक बस अपघातात वाचलेल्या अनिता सुकदेव चौधरी सांगत होत्या. येथे वाचा संपुर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.