आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Haryana Congress | Former CM Bhupinder Singh Hooda | Rajya Sabha MP Randeep Surjewala | Karnataka Congress

पडसाद:काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयाचे हरियाणात परिणाम; सुरजेवालांचे दिल्लीतील वजन वाढले, हुड्डा गटाच्या संघटनेत बदल निश्चित

चंदीगड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयाचा परिणाम हरियाणा काँग्रेसमध्येही दिसण्याची शक्यता आहे. या विजयाचा सर्वाधिक फायदा राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांना झाला. सुरजेवाला हरियाणातील एक बडे नेते आहेत. ते कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी होते. त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसचा विजय झाल्यामुळे त्यांचे दिल्लीतील वजन वाढणार आहे. याचा परिणाम हरियाणा काँग्रेसच्या संघटना यादीवरही होणार आहे. या यादीत समाविष्ट असलेली अनेक नावे आता बदलली जाण्याची शक्यता आहे.

सुरजेवाला यांची उंची वाढल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम पक्षातील दुसऱ्या गटावरही दिसून येईल. यात प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या गटबाजीला सर्वाधिक फटका बसला जाण्याची शक्यता आहे.

एक गट देतोय सुरजेवालांना विजयाचे श्रेय
हरियाणातील काँग्रेस पक्षाचा एक गट कर्नाटकातील विजयाचे श्रेय सुरजेवाला यांना देत आहे. कैथल जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मिठाईचे वाटप केले आहे. याचे खास कारण म्हणजे रणदीप सुरजेवाला यांचा हा बालेकिल्ला आहे. या विजयाचे श्रेय सुरजेवाला यांनाच जाते, असे अन्य गटातील नेतेही शांतपणे सांगत आहेत. पण हुड्डा गट यासाठी केंद्रविरोधी लाट कारणीभूत असल्याचा दावा करत आहे.

हरियाणा काँग्रेसवर काय परिणाम होईल
सुरजेवाला यांची दिल्लीतील उंची वाढल्यामुळे त्याचा सर्वात मोठा परिणाम राज्यातील पक्ष संघटनेवर दिसून येईल. केंद्रीय नेतृत्वाला देण्यात आलेल्या यादीत माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच केंद्रीय नेतृत्वाने अद्याप ही यादी जाहीर केली नाही. याशिवाय 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयांवर सुरजेवाला यांचा प्रभाव दिसून येईल.

राजकारणाचा वारसा
रणदीप सुरजेवाला यांना राजकीय वारसा आहे. त्याचे वडील दिवंगत चौधरी शमशेर सिंग सुरजेवाला हे काँग्रेसचे बडे नेते होते.शमशेर सिंग सुरजेवाला यांनी कैथल विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवून जिंकली. रणदीप सुरजेवाला 2010 व 2015 मध्ये कैथलमधून आमदार व मंत्री झाले. पण 2018 मध्ये त्यांना जिंद पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

रणदीप यांनी ओपी चौटालांचा केला पराभव
रणदीप सुरजेवाला नरवानामधून दोनदा आमदार झाले. त्यांचा तत्कालीन आयएनएलडी सुप्रीमो ओमप्रकाश चौटाला यांच्याकडून पराभव झाला होता. पण 2005 मध्ये रणदीप सुरजेवाला यांनी नरवाना विधानसभेतून माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचा पराभव करून बदला घेतला. तेव्हापासून कैथलमधील काँग्रेस कार्यकर्ते व सुरजेवाला समर्थकांना जल्लोष करण्याची संधी मिळू शकली नाही. आता कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे सुरजेवाला यांना नवसंजीवनी मिळाली आहे.