आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Haryana Gangster Lawrence Bishnoi SharpShooter Rahul Arrested By Faridabad Police

सलमान खानच्या खुनाचा कट:तुरुंगात कैद असलेल्या गँगस्टर लॉरेंस बिश्नोईने रचला कट, पोलिसांनी शार्प शूटरला घेतले ताब्यात

फरीदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फरीदाबाद पोलिसांनी लॉरेंस बिश्नोईचा शार्प शूटर राहुलला उत्तराखंडमधून अटक केली
  • राहुलने जानेवारीमध्ये मुंबईला जाऊन सर्व पाहणी केली, लॉकडाउनमुळे योजना फसली

पोलिसांनी अटक केलेल्या एका शार्प शूटरने खुलासा केला आहे की, अभिनेता सलमान खानच्या खुनाचा कट रचला जात होता. पण, कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे योजना फसली. हा कट हरियाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या गँगने रचला होता. गँगचा शार्प शूटर राहुल उर्फ सांगा उर्फ बाबाला फरीदाबाद पोलिसांनी 15 ऑगस्टला उत्तराखंडमधून अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, लॉरेंस बिश्नोईने सलमानल मारण्याची जबाबदारी राहुलला दिली होती. राहुलने जानेवारीमध्ये मुंबईला जाऊन सलमान खानच्या वांद्रे येथील घराची पाहणी केली होती. पोलिसांनी 24 जूनला फरीदाबादमध्ये एका व्यक्तीच्या खुनाचा तपास करताना राहुलाल अटक केली होती. गँगच्या इतर चार जणांना अटक करण्यात आली आहे.

तुरुंगात कैद असलेल्या लॉरेंस बिश्नोईने दिली होते टार्गेट

डीसीपीने सांगितले की, शार्प शूटरने चौकशीदरम्यान सलमानच्या खुनाचा कट रचला जात असल्याचा उलगडा केला. त्यांने सांगितले की, त्याला जोधपूरच्या तुरुंगात कैद असलेल्या कुख्यात गँगस्टर लारेंस बिश्नोईने मुंबईला जाऊन सलमानची पाहणी करण्यास सांगितले होते. मारण्याची प्लॅनिंग नंतर केली जाणार होती, पण त्याआधीच कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाला. डिसेंबर2019 मध्ये राहुल उर्फ बाबानेच दिल्लीमधून गुंड नरेश शेट्टीला पोलिसांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून कस्टडीतून पळवले होते.

लॉरेंस गँगचे यामुळे आहे सलमानसोबत शत्रुत्व

लॉरेंस बिश्नोईने हरिणाच्या शिकारीवरुन यापूर्वीही सलमानला मारण्याची धमकी दिली होती. यामागे एक कारण आहे. कारण हे की, राजस्थानमधील बिश्नोई समाज काळ्या हरिणाची पुजा करते. सलमान खानवर काळ्या हरिणाला मारण्याचा आरोप आहे. सलमानविरोधात विश्नोई समाजाने खटला दाखल केला आहे. लॉरेंस स्वतः बिश्नोई समाजातील आहे, यामुळेच त्याचे सलमानसोबत शत्रुत्व आहे. यापूर्वी जून 2018 मध्येही लॉरेंसने आपल्या जवळच्या कुख्यात गुंड संपत नेहराला सलमानच्या मागावर पाठवले होते. पण, त्यावेळेसही प्रयत्न फसला होता.

बातम्या आणखी आहेत...