आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनच्या परीक्षणासाठी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी शुक्रवारी अंबालामधील हॉस्पीटलमध्ये स्वतः भारत बायोटेकची Covaxin लस घेतली. अनिल विज यांनी व्हॅक्सीनच्या तिसऱ्या ट्रायलसाठी वॉलंटियरसाठी आपले नाव दिले होते. शुक्रवारी Covaxin चे तिसरे ट्रायल सुरू झाले आहे आणि देशभरात एकूण 25,800 जणांवर या व्हॅक्सीनचे ट्रायल झाले आहे.
अनिल विज यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले की, त्यांना डायबिटिज आहे, तरीदेखील त्यांनी ही लस घेतली आहे. या ट्रायलमध्ये वयाची अट नसल्यामुळे हाय रिस्क व्यक्तींनाही कोरोनाची लस दिली जात आहे.
अनिल विज पुढे म्हणाले की, "लस देण्यापूर्वी माझ्या चाचण्या झाल्या. रोहतक पीजीआयमधून एक्सपर्ट्सची टीम आली आहे. टीमने माझी परवानगी घेतल्यानंतरच मला इंजेक्शन दिले आणि अर्धा तास मला ऑब्जर्वेशनमध्ये ठेवले. ही लस घेतल्यानंतर मला कोणत्याच प्रकारचा साइड इफेक्ट जाणवला नाही."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.