आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरात तीन हजार कोटी रुपयांचा फ्रॉड करणारा सातवी फेल फ्युचर मेकर कंपनीचा अध्यक्ष तथा सीएमडी राधेश्याम आता 'गुरू' बनला आहे. राधेश्याम गेली सव्वा चार वर्ष जेलमध्ये होता. जानेवारी २०२२ मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला. यानंतर तो हिसार आपल्या मुळ गावी जाण्याऐजवी गायबच झाला. तर आता अचानक प्रवचनाच्या नावाखाली लोकांना ज्ञान वाटत सुटला आहे.
राधेश्याम स्वतःला भगवान श्रीकृष्णाचा भक्त सांगत आहे. त्याने परमधाम नावाची स्वतःची संस्था स्थापन केली आहे. त्याच नावाने त्याने आपले सोशल मीडिया अकाउंट बनवले आहे. यावर त्याच्या प्रवचनाचे 12 व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये तो आजच्या इतर बाबांना किंवा गुरूंना टीका टिप्पणी करत आहे.
राधेश्याम त्याच्या व्हिडिओत म्हणतो की, कोणतेही बाबा अध्यात्मिक ज्ञान देत नाही, तर ते व्यवसाय करत आहेत. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोट्यवधी लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा राधेश्याम म्हणतोय की, देवाने जे काही दिले त्याचा आनंद घ्या.
जाणून घ्या- कोण आहे राधेश्याम, त्याने कसा केला 3 हजार कोटींची फसवणूक
सेमिनारच्या माध्यमातून लोकांना जोडले : राधेश्याम लोकांना जोडण्याच्या कलेमध्ये तज्ञ होता. सेमिनारच्या माध्यमातून तो लोकांना जोडतो. जिथे त्याचे शब्द आणि ग्लॅमर पाहून तरुण त्याच्या जाळ्यात अडकत राहिले.राधेश्यामने एका वर्षात कंपनीत 1 कोटी लोकांना जोडण्याचा दावा केला होता. त्याला वैयक्तिक सुरक्षा होती आणि तो जग्वारमध्ये गाडी चालवत असे. देशातील मोठ्या शहरांमध्ये त्याचे कार्यक्रम होऊ लागले.
असा भांडाफोड झाला राधेश्यामच्या कंपनीचा
तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी हरियाणा पोलिसांसह हिसारमध्ये सुरू असलेल्या मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनीचा पर्दाफाश केला. गेल्या 4-5 वर्षांपासून या कंपनीने जनतेची सुमारे 1,200 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हरियाणाच्या एसटीएफसह तेलंगणा पोलिसांनी आरोपीला अटक केली.
राधेश्याम आणि सुरेंद्र सिंग हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार म्हणून तपासात समोर आले. राधेश्याम फ्युचर मेकर लाईफ केअरचा अध्यक्ष आणि सुरेंद्र सिंग हा ग्लोबल मार्केटिंगचा संचालक होता. पोलिसांनी कंपनीचे 200 कोटी रुपये जप्त केले आहेत.
9 राज्यांमध्ये 50 एफआयआर
2018 मध्ये राधेश्यामच्या फ्युचर मेकर कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली 3 हजार कोटींची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले. या फसवणुकीप्रकरणी हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात सुमारे 50 गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 21 आरोपींना अटक केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने सुमारे 300 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
राधेश्यामने सांगितली 'गुरु' होण्याची कहाणी
राधेश्याम म्हणत आहेत की, त्यांनी चार वर्षांत मनापासून ध्यान केले. ज्यामध्ये त्याने ज्ञान प्राप्त केले. तो म्हणाला की, देवाने येणाऱ्या पिढ्यांना ज्ञान देण्याचा मार्ग दाखवला. चार वर्षांत मी भगवद्गीतेवर काम केले आहे. 8 ते 10 पुस्तके लिहिली आहेत आणि लवकरच ध्यान शिबिर सुरू करणार आहे.
लोक म्हणाले - आमचे पैसे खाऊन बनावट गुरू झाला
राधेश्यामच्या ज्ञानावर लोक खूप कमेंट समोर येत आहे. अनेक गरीब लोक शाप देत आहेत. आता ज्ञान दिल्याने काही फरक पडणार नाही. तुला याच जन्मी दु:ख भोगावे लागेल. एका यूजर ईश्वर मेहताने म्हटले की, लोकांचे पैसे खाऊन गुरू बनणे योग्य नाही. आधी गरीबांचे पैसे परत करा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.