आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Haryana Murder LIVE Video; Hisar Agroha Husband Murders Wife | CCTV Footage | Haryana

थरार:गरोदर महिलेच्या मर्डरचा VIDEO, बायको लिव्ह - इनमध्ये राहत असल्याचा राग; पतीने धारदार शस्त्राने भर रस्त्यात केले ठार

हिसारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाच्या हिसारमध्ये एका 4 महिन्यांच्या गरोदर महिलेची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. पत्नी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने हे हत्याकांड घडवले.

आरोपी पती मरेपर्यंत आपल्या पत्नीवर चाकूने वार करत होता. हिसारच्या अग्रोहा ब्लॉकमधी लंधारी गावात बुधवारी रात्री ही घटना घडली. मृत 29 वर्षीय राजबाला पतीला सोडून गत अनेक महिन्यांपासून अशोक नामक व्यक्तीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होत्या. यामुळे पती रोशन लालने त्यांची हत्या केली. पोलिसांनी रोशन लालच्या मुसक्या आवळल्या आहेत.

1 मिनिटाच्या व्हिडिओत हत्या कैद
या हत्येचे 1 मिनिटाचे सीसीटीव्ही फुटेज उजेडात आले आहे. त्यात राजबाला प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) लसीकरण करून सिमरन नामक महिलेसोबत घरी जात असल्याचे दिसत आहे. ती गेटजवळ पोहोचताच तिचा पती रोशनलाल तिथे होता. त्याच्या हातात धारदार शस्त्र पाहून घाबरलेली राजबाला पुन्हा पीएचसीच्या दिशेने धावत सुटते.

हे पाहून रोशनलाल तिच्यावर मागून हल्ला केला. त्यात ती जमिनीवर कोसळते. त्लीयानतंर तो तिच्यावर सलग 9 वार करतो. त्यात ती ठार झाल्यानंतरही तो तिच्यावर हल्ला करणे थांबवत नाही. त्यानंतर तो बाहेर जातो आणि पुन्हा परत येऊन राजबालाचा मृत्यू झाला किंवा नाही हे पाहतो. आरोपीने राजबालावर एकूण 10 वार केले. ही घटना सुरू असताना कुणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. खून केल्यानंतर आरोपी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघून जातो.

पत्नीचा पाठलाग करताना आरोपी पती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
पत्नीचा पाठलाग करताना आरोपी पती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.

लग्नाच्या 2 वर्षानंतर प्रेमप्रकरण

राजबालाचा विवाह रोशन लालसोबत 2013 मध्ये झाला होता. त्यानंतर त्यांना मुलगा झाला. जो आता 5 वर्षांचा आहे. तो आजोबांकडे राहतो. पोलिसांच्या माहितीनुसार, लग्नाच्या 2 वर्षांनंतर म्हणजे 2015 मध्ये राजबालाचे अशोकसोबत प्रेम प्रकरण सुरू झाले. त्यावेळी रोशनलाल ट्रॅक्टर चालवायचा. त्यानंतर 10 महिन्यांपूर्वी दोघेही घरातून पळून भाना गावात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

हे प्रकरण सोडवण्यासाठी अनेकदा पंचायती बसल्या. त्यांना गावाबाहेर काढण्याचा निर्णयही पंचायतीने सुनावला. पण त्यानंतरही गावातच राहू लागले. यामुळे हे हत्यांकाड घडले.