आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरियाणातील कर्नाळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर धुक्यामुळे 3 ठिकाणी अपघात झालेत. तिन्ही ठिकाणी 30 वाहने एकमेकांना धडकली आहेत. त्यात 12 जण गंभीर जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पोहोचवले.
पहिला अपघात कुटेल ओव्हर ब्रिजजवळ घडला. त्यात 15 ते 16 वाहने एकमेकांना धडकली. ट्रक, कार, ट्रॅक्टर ट्रॉली व बस दुर्घटनाग्रस्त झाल्या. त्यात काहीजण जखमी झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिस व वाहन चालकांत अफरातफरी माजली. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
अपघातानंतर हायवेवर वाहतूक विस्कळीत
एकाचवेळी अनेक वाहनांचा अपघात झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. जखमी प्रवाशांचा आकांत दूरवर ऐकू येत होता. धुक्यामुळे हरियाणा रोडवेज्या 2 बसही दुर्घटनाग्रस्त झाल्या. त्यात काही प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये शिरली कार
या अपघातात हरियाणा रोडवेजच्या बसखाली एक डस्टर कार शिरली. त्यात काही प्रवाशी जखमी झाले. दुर्घटनेमुळे हायवेवर एखाद्या खेळण्यासारखे वाहने पडली होती.
दुसरा अपघात मधुबन व तिसरा टोल नाक्यावर झाला
दुसरीकडे, मधुबनजवळ दुसरा अपघात झाला. या ठिकाणी 10 ते 12 गाड्या एकमेकांना धडकल्या. त्यात प्रवाशी गंभीर जखमी झाले. जखमींना पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात हलवले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. तिसरा अपघात कर्नाळ टोलजवळ झाला.
पोलिस तपास सुरू
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धुक्यामुळे हा अपघात घडला. त्यात 30 वाहने एकमेकांना धडकून 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सकृतदर्शनी धुक्यामुळे घडल्याचा दावा केला जात असला तरी त्यामागील नेमके कारण शोधण्याचा तपास केला जात आहे.
धुक्यामुळे दृश्यमानता घटली
उल्लेखनीय बाब म्हणजे हिवाळ्यात पडणाऱ्या धुक्यामुळे दृश्यमानता घटते. त्यामुळे या भागात नेहमीच असे अपघात घडततात. हायवेवर एखादी दुर्घटना घडली, तर दुसऱ्या वाहनचालकाला त्याचा वेळीच अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनांची एकमेकांना टक्कर होते. अशा प्रकारे इतर वाहनचालकही अपघाताला बळी पडतात.
अपघाताचे काही फोटो पाहा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.