आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Haryana News And Update; Manohar Lal Khattar Convoy Attack Update | Farmers Attack On Haryana CM Manohar Lal's Convoy In Ambala

शेतकऱ्यांचा रोष:हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या गाडीवर शेतकऱ्यांचा लाठ्यांनी हल्ला

अंबालाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे

कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांची नाराजी वाढताना दिसत आहे. या नाराजीचा सामना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनाही करावा लागला. मंगळवारी नाराज सेतकऱ्यांनी खट्टर यांच्या ताफ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला आणि काळे झेंडे दाखवत सरकारविरोधी घोषणाही दिल्या. यादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्का-बुक्कीदेखील झाली.

आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर लाठ्या मारल्या

मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना शेतकरी शांततेत त्यांना काळे झेडें दाखवत होते. यादरम्यान पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे भडकलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गाडीवर लाठ्या-काठ्या मारणे सुरू केले. मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर लाठ्या मारल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवले आणि यावेळी त्यांच्यात धक्का-बुक्कीदेखील झाली.

बातम्या आणखी आहेत...