आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:REEL बनवताना 5 गाड्यांची धडक; भरधाव कारमध्ये स्टेअरिंग सोडून बनवत होता व्हिडिओ, APRO सह अनेक जखमी

पानिपत22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणातील पानिपतमध्ये शुक्रवारी सायंकाळी REEL बनवण्याच्या नादात एका कार चालकाकडून मोठी दुर्घटना घडली. हा कार चालक स्टेअरिंग सोडून रील बनवत होता. त्यानंतर अचानक त्याच्या भरधाव वेगातील कारने लागोपाठ 5 वाहनांना धडक दिली. पानिपतच्या समलखा शहरात हा अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झालेत. लोकांनी पाठलाग करून आरोपी कार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

पानिपतचे एपीआरओ दीपक पराशर व त्यांच्या मुलाचाही जखमींमध्ये समावेश आहे. कार चालकाने त्यांच्या स्कूटीला मागून धडक दिली. पोलिस नियंत्रण कक्षाच्या डायल 112 या क्रमांकावर अपघाताची माहिती देण्यात आली.

पानिपतचे एपीआरओ दीपक पराशर यांनी सांगितले की, ते शुक्रवारी सायंकाळी आपल्या आईला भेटायला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा शौर्यही होता. अनाज मंडईहून ते मनाना रोडवर आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने (एचआर 60 के 9242) त्यांना धडक दिली. त्यांच्या मते, आरोपी कार चालक स्टेअरिंग सोडून कारमध्ये व्हिडिओ रील बनवत होता.

घटनास्थळावरून पोबारा

स्कूटीच्या धडकेत ते व त्यांचा मुलगा खाली पडून जखमी झाले. अपघातानंतर आरोपी कार चालकाने ब्रेक लावले. एपीआरओला त्याच्या गाडीची चावी काढायची होती. पण त्याने पटकन कारच्या काचा वर करून घटनास्थळावरून पोबारा केला. या धावपळीत त्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी चालकाला धडक दिली. त्यात सदर दुचाकीस्वारही जखमी झाला. अपघातानंतर लोकांनी कार चालकाचा पाठलाग केला. पण तो सापडला नाही. कार चालकाने या घटनेनंतर 3 दुचाकींना उडवल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दिव्य मराठीच्या इतर बातम्या वाचा...

धनश्री वर्माचा थ्रोबॅक व्हिडिओ:ट्रेंडिंग गाण्यावर बनवली रील, डान्स व्हिडिओ केला शेअर

भारतीय क्रिकेट संघाचा स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी आणि डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्माचा थ्रोबॅक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. थ्रोबॅक व्हिडिओमध्ये धनश्री हॉलिवूडच्या ट्रेंडिंग गाण्यावर नाचताना दिसत आहे. धनश्री स्पोर्टी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये धनश्रीच्या स्मार्ट डान्स मूव्ह्स पाहून चाहते नेहमीप्रमाणे इम्प्रेस झाले आहेत. अलीकडेच धनश्री वर्माच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती, ज्याची माहिती तिने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे दिली. धनश्री आता काही दिवस विश्रांती घेत आहे. पाहा व्हिडिओ...

स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू VIDEO:मालवा एक्सप्रेस रेल्वेतून पडला; रील बनवताना अपघात; समराळा पुलाजवळ आढळला मृतदेह

सध्या तरुणांमध्ये स्टंटबाजी करित रील बनवण्याचे भूत वावरत आहे. यात अनेक तरुणांचे अपघात होत आहेत. तर अनेकांना जीव देखील गमवावा लागत आहे. पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रील बनवण्यासाठी ट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा हा व्हिडिओ आहे.

हा तरुण मालवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढला होता. जो दिल्लीला जाणार होता. अचानक खन्ना येथील समराळा पुलापासून काही अंतरावर हा तरुण रेल्वेच्या दारात आला आणि बाहेर लटकून स्टंटबाजी करू लागला. दुसऱ्या दरवाज्याजवळ उभा असलेला दुसरा तरुण त्याचा व्हिडीओ बनवत होता. मात्र त्याचदरम्यान हा धक्कादायक अपघात झाला. येथे वाचा संपूर्ण बातमी...