आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण:हरियाणा-पंजाबची हवा धोकादायक; 12 सर्वात दूषित शहरांत 4 हरियाणाची

पानिपतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन राज्यांत हवेची पातळी वाईट, 15 ऑक्टोबरनंतर दुसरा मोठा आकडा

दिवाळीपूर्वी तीन राज्यांत प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे समोर आले आहे. यामध्ये हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. देशातील १२ शहरांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक(एक्यूआय) ३०० ते ४०० मायक्रोग्रॅमदरम्यान राहिला. यामध्ये हरियाणानंतर फरिदाबाद, कैंथल, बहादूरगड, सोनिपतचा समावेश आहे. ८ शहरे उत्तर प्रदेशची आहेत. एक्यूआयचा हा स्तर खूप वाईट मानला जातो. दुसरीकडे हरियाणाच्या ८ जिल्ह्यांत एक्यूआय २०० ते ३०० दरम्यान “वाईट’ पातळीवर राहिला. पंजाबमध्येही पिकाचे काड जाळले जात आहे. प्रदूषणाचे मोठे कारण पऱ्हाट्या जाळल्याचे मानले जाते. हवामान विभागानुसार, उत्तर भारतातील अनेक शहरांत हवेची गुणवत्ता “वाईट’ श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागातील शास्त्रज्ञ व्ही.के. सोनी म्हणाले, ईशान्य हवा आणि फटाके फोडल्यामुळे हा ५ ते ६ नोव्हेंबरला प्रदूषणाचा स्तर “खूप वाईट’ श्रेणीत येऊ शकतो. यामध्ये हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील क्षेत्र सर्वात जास्त प्रदूषित होऊ शकते.

पंजाब : एका दिवसात १७९७ पऱ्हाट्या जाळल्या
पंजाबमध्ये सर्वात जास्त पऱ्हाट्या जाळण्याच्या घटना संगरूरमध्ये १८९ आणि सर्वात कमी मोहालीत ३ प्रकरणे समोर आली आहेत. या हंगामात आतापर्यंत १४,९२० प्रकरणे समोर आली आहेत. गुरदासपूर १५६ प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बरनालामध्ये तिसरी सर्वात जास्त प्रकरणे समोर आली आहेत. लुधियाना जिल्ह्यातील खन्ना भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक(एक्यूआय) सर्वात जास्त खराब राहिला. हा मानक २०० चा मानक पार होऊन २०२ नोंदला. सर्वात स्वच्छ हवामान भटिंडामध्ये एक्यूआयची पातळी १२० राहिली. सर्व प्रमुख जिल्ह्यांत एक्यूआय पातळी १०० वर आहे.

बातम्या आणखी आहेत...