आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:सोनीपतमध्ये नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांना मारहाण, मशिदीतही तोडफोड; महिला-मुलांनाही सोडले नाही, 10 जखमी

सोनीपत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनीपतमध्ये नमाज पठण करताना झालेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले.  - Divya Marathi
सोनीपतमध्ये नमाज पठण करताना झालेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. 

हरियाणाच्या सोनीपतमधील सांदल कलां गावात रविवारी रात्री नमाज पठण करताना हिंसाचार झाला. लाठ्या-काठ्या, तलवारी व चाकू घेऊन आलेल्या जवळपास 25 तरुणांनी मशिदीत नमाज पठण करणाऱ्यांवर हल्ला केला. त्यांना जबर मारहाण केली. त्यात जवळपास 10 जण जखमी झाले. त्यांना सोनीपत व खानपूर वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त सतीश बालन यांनी सकाळी गावात जाऊन स्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी मुले व महिलांनाही सोडले नाही. त्यांनाही मारहाण केली. हल्लेखोर त्यांच्या नमाज पठणावर नाराज होते. या हिंसाचारानंतर भागातील स्थिती तणावपूर्ण झाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले. सध्या येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोनीपतमध्ये हातात लाठ्या-काठ्या घेऊन उभे असणारे तरुण.
सोनीपतमध्ये हातात लाठ्या-काठ्या घेऊन उभे असणारे तरुण.

कोणताही वाद नाही, केवळ नमाजवर आक्षेप

सलीम खान यांनी सांगितले की, आम्ही नमाज अदा करत होतो. तेव्हा 20-25 तरुण आले. त्यातील एका बिट्टा म्हणत होते. आमचा त्यांच्याशी कोणताही वाद नाही. त्यांनी केवळ आमच्या नमाजावर आक्षेप नोंदवत आम्हाला मारहाण केली.

नमाज पठण करताना मारहाण

मुहम्मद सलीम यांनी सांगितले की, आम्ही रात्री 9 च्या सुमारास नमाज पठण करत होतो. तेव्हा अचानक हल्ला झाला. मारहाण का झाली हे आम्हाला माहिती नाही. त्यांनी काठ्यांनी मारहाण केली. त्यांच्या हातात चाकू व हॉकी स्टीक होती. या घटनेत वृद्ध व मुलेही जखमी झालेत.

पोलिसांनी स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलिसांनी स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

तोशीना यांनी सांगितले की, ते आम्हाला शिवीगाळ करत होते. नमाज अदा करण्यापासून रोखत होते. रझियाने सांगितेल की, गावात एका खोलीएवढीच मशिद आहे. तिथे पुरुष नमाज पठण करत होते. त्यावेळी हल्ला झाला. या घटनेत जवळपास 10 ते 15 जण जखमी झालेत.

पोलिसांच्या पहाऱ्यात ग्रामस्थांचे दैनंदिन कामकाज सुरू.
पोलिसांच्या पहाऱ्यात ग्रामस्थांचे दैनंदिन कामकाज सुरू.

पोलिस आयुक्तांचा गावात डेरा

या घटनेनंतर पोलिस आयुक्तक बी सतीश बालन यांनी सोमवारी सकाळी सांदल कलां गावात धाव घेतील. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्थितीचा आढावा घेऊन पीडितांशी चर्चा केली. पीडितांना सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत गावात पोलिस तैनात असतील, असे ते म्हणाले.

सतीश बालन म्हणाले की, गावातील काही असामाजिक तत्वांनी रविवारी रात्री मशिदीत शिरून नमाज पठण करणाऱ्यांना मारहाण केली. त्यांच्यात कोणतेही वैमनस्य नव्हते. या प्रकरणी पोलिसांनी 16 तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. भविष्यात विनाकारण धार्मिक स्थळात शिरून असा प्रकार केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

सांदल कलां गावात पोहोचलेले पोलिस आयुक्त बी सतीश बालन.
सांदल कलां गावात पोहोचलेले पोलिस आयुक्त बी सतीश बालन.

पाहा हल्ल्याशी संबंधित फोटो...