आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Haryana | The Injured Went To His House To Be Beaten Up By The Car Driver, Family Members, Death In PGI

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:अपघातातील जखमी युवकाला घरी सोडण्यासाठी गेले कारमधील व्यक्ती, जखमीच्या कुटुंबाने काठ्यांनी केली बेदम मारहाण; एकाचा मृत्यू

जींद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो कार चालक विकासाचा आहे. जखमी लाभसिंगच्या कुटुंबीयांनी त्याला मारहाण केली. नंतर त्याचा मृत्यू झाला - Divya Marathi
हा फोटो कार चालक विकासाचा आहे. जखमी लाभसिंगच्या कुटुंबीयांनी त्याला मारहाण केली. नंतर त्याचा मृत्यू झाला
  • कार आणि दुचाकीच्या धडकेत जखमी झाला होता दुचाकीस्वार
  • कार चालक वडिलांसोबत जखमीला घरी सोडण्यासाठी गेले होते

हरियाणातील जींदमध्ये रविवारी संध्याकाळी एक दुचाकी आणि कारचा अपघात झाला. अपघातात जखमी दुचाकीस्वाराला कारचालक त्याच्या घरी सोडण्यासाठी गेला. मात्र जखमी व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्याला बेदम मारहाण केली. यानंतर कार चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण? 

विकास (24) आपल्या वडिलांसोबत कारने पाजू गावातून सफीदोंकडे जात होते. खेडा खेमावती गावातील रहिवासी लाभ सिंह (24) समोरून दुचाकीवर येत होता. एका वळणावर कार आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार लाभ सिंह जखमी झाला. माणुसकीच्या नात्याने विकास आणि त्याचे वडील जखमी लाभ सिंहला त्याला घरी सोडण्यासाठी गेले. मात्र तेथे लाभ सिंहच्या कुटुंबियांनी विकास आणि त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत विकासला रोहतक येथे नेण्यात आले. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. 10 लोकांनी विकासला काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. 

गुन्हा दाखल

पोलिसांनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून अज्ञात लोकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...