आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका नवरीने भर लग्नमंडपातच गोळीबार केल्याची अजब घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नवरदेवाला हार घातल्यानंतर स्टेजवरच हवेत गोळीबार करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना नवरदेव तिच्या बाजूलाच शांतपणे बसलेला असतो.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, हाथरस जंक्शन क्षेत्रातील सलेमपूर गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करूनतपास सुरू केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, स्टेजवरील एका खुर्चीत नवरदेव व नवरी बसलेली आहे. तेव्हा स्टेजवरीलच एक तरुण वधूच्या हातात रिव्हॉल्व्हर देतो. त्यानंतर वधू कोणताही विचार न करता हवेत ताडताड 4 गोळ्या झाडते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलेमपूरच्या गेस्ट हाऊसमध्ये शुक्रवारी एक लग्न होते. वऱ्हाडी मंडळीच्या पाहुणचारानंतर लग्नविधी संपन्न झाला. त्यानंतर वरमाळेसाठी नवरदेवाला स्टेजवर बोलावण्यात आले. थोड्यावेळानंतर नवरीही स्टेजवर पोहोचली. दोघांनी एकमेकांना वरमाळा घातली.
वरमाळा टाकल्यानंतर आनंदात गोळीबार
शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास वरमाळाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर वर-वधूंना आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईक स्टेजवर आले. त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले. यावेळी काळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण स्टेजवर येऊन वधूजवळ येऊन थांबतो. थोड्यावेळानंतर हा तरुण पिस्तूल काढून वधूच्या हातात देतो. त्यानंतर वधू कोणताही मागचा-पुढचा विचार न करता थेट हवेत गोळीबार करते. ती सलग 4 फैरी हवेत झाडते. यावेळी वधूचा आवेश पाहून वऱ्हाडी मंडळीही थक्क होते.
वधू हाथरस जंक्शन क्षेत्रातील एक गावची आहे. वरातही जिल्ह्यातीलच एका गावातून आली होती. वधूच्या हातात पिस्तूल देणारा तरुणही वधूच्या कुटुंबातीलच सदस्य आहे.
हाथरसचे एएसपी अशोक कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी व्हिडिओच्या आधारावर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच वधूच्या कुटुंबीयांची चौकशी केली जाईल. ज्या मुलाने तिच्या हातात पिस्तूल दिले, त्याचाही शोध घेतला जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.