आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​​​​​​​हाथरस गँगरेप प्रकरण:आरोपींना भेटण्यासाठी तुरुंगात जाणाऱ्या भाजप खासदाराचे स्पष्टीकरण, म्हणाले - जेलरने चहा पिण्यासाठी बोलावले होते

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिथे कोणत्याही आरोपीची भेट मी घेतली नसल्याचे स्पष्टीकरण खासदार दिलेर यांनी दिले आहे.

हाथरस सामूहिक बलात्काराप्रकरणी राजकारण सध्या तापलेले दिसत आहे. दरम्यान स्थानिक भाजप खासदार राजवीर सिंह दिलेर यांच्यावर आरोप आहे की, ते रविवारी आरोपींना भेटण्यासाठी तुरुंगात गेले होते. मात्र जेलरच्या खोलीतूनच त्यांना परत पाठवण्यात आले. जेल प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाही. मात्र आता या प्रकरणी खासदार राजवीर दिलेर यांनी आरोपींना भेटण्याच्या प्रयत्न करण्याच्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

दलित तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या चौघांची भाजपचे स्थानिक खासदार राजवीर सिंह दिलेर यांनी भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यावर स्पष्टीकरण देत भाजप खासदार म्हणाले की, मी आरोपींना भेटलो नाही. मी कारागृहासमोरून जात होतो दरम्यान काही लोक भेटले. त्यांच्याशी बोलत असल्याचे पाहून जेलरने मला चहा घेण्याचा आग्रह केला यामुळे मी आत गेलो. तिथे कोणत्याही आरोपीची भेट मी घेतली नसल्याचे स्पष्टीकरण खासदार दिले यांनी दिले आहे.

हाथरस हा अनुसूचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघ आहे. तेथून दिलेर निवडून आले आहेत. खासदार दिलेर व त्यांच्या मुलीनेच आमच्या मुलांना या प्रकरणात मुद्दाम अडकवले, असे आरोपीचे नातेवाईक म्हणत आहेत. आरोपी ठाकूर समाजाचे आहेत. तिथे ठाकूर व वाल्मिकी सामाजिक यांच्यातील तेढ वाढत असल्याचे चित्र आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser