आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hathras Case : The Shameful Truth Is Many Indians Don’t Consider Dalits, Muslims And Tribals To Be Human

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाथरस प्रकरणावरुन निशाणा:'या देशातील लज्जास्पद सत्य हे आहे की, अनेक भारतीय दलित, मुस्लिम व आदिवासींना माणूसच मानत नाहीत' - राहुल गांधी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हाथरस प्रकरणावरून देशभरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सातत्याने उत्तरप्रदेश सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा या विषयावरुन यूपी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या देशातील लज्जास्पद सत्य हे आहे की अनेक भारतीय देशातील दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहेत.

हाथरस प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. मात्र आता या हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यावरून उत्तर प्रदेश पोलीस व योगी सरकारवर टीका केली जाते आहे. यावरुनच आता राहुल गांधींनीही निशाणा साधला आहे.

'या देशाचे लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्री (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) आणि त्यांचे पोलिस म्हणत आहेत की, कुणीही बलात्कार केलेला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती कुणीही नव्हती' असे म्हणत राहुल गांधींनी यूपी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान सध्या हाथरसमधील सामूहिक बलात्काराचा तपास सुरू आहे. यूपी सरकारने शिफारस केल्यानंतर हा तपास सीबीआयकडे दिला आहे. मात्र तरीही या प्रकरणावरून योगी सरकारवर होणारी टीका अजूनही सुरूच आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर निशाणा साधला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser