आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hathras Gang Rape Case Latest News Updates: Last Rites Of Gang Rape Victim Has Been Performed By Police In Hathras

हाथरस गँगरेप:कुटुंबाचा दावा-पोलिसांनी रात्री गुपचूप केला पीडितेचा अंत्यविधी; लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आई-वडिलांचा आक्रोश

हाथरस25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी योगींना सांगितले- 3 सदस्यांची एसआयटी स्थापन करुन 7 दिवसात रिपोर्ट द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. आरोपींनी तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पाठीचा कणा मोडला आणि बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. उपचार दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. यातच आता पीडितेवर रात्री पोलिसांनी गुपचूप अंत्यविधी पार पाडल्याचा कुटुंबाकडून आरोप होत आहे. पीडितेच्या कुटुंबाचा आरोप आहे की, पोलिसांनी बळजबरीने अंत्यविधी केला आणि अखेरचा चेहराही पाहू दिला नाही. भास्करशी बोलताना पीडितेचा भाऊ म्हणाला की, "पोलिसांनी आम्हाला तिचा चेहरादेखील पाहू दिला नाही. पोलिस कोणाला जाळले हेदेखील आम्हाला ठाऊक नाही.''

याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनात यांच्याशी बातचीत करुन दोषींवर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे.

पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांवर त्यांच्या नातलगांशी मारहाण केल्याचा आणि त्यांना गावात येण्यापासून रोखल्याचा आरोप लावला आहे. पीडितेच्या मोठ्या भावाने सांगितले, 'आमच्या घरात घुसून महिला पोलिसांनी घरातीलमहिलांना मारहाण केली. नातेवाईकांना गावात येण्यापासून रोखले आणि रात्री जबरदस्तीने अंत्यसंस्कार केला. आम्ही त्यांना म्हणालो की, किमान सूर्योदय होईपर्यंत थांबा, पण त्यांनी आमचे ऐकले नाही.

पीडितेच्या कुटुंबाने आता पोलिसांवर प्रकरण दाबल्याचा आरोप केला जात आहे. त्यांचे म्हणने आहे की, 'पोलिस आता सांगत आहेत की, तिची जीभ कापली नाही, तिचा पाठीचा कणा मोडला नाही. पोलिसांना कोणत्याही प्रकारे हे प्रकरण दाबायचे आहे. पोलिसांनी अद्याप गँगरेप केल्याची पुष्टीदेखील केली नाही. माध्यमांना गावात येऊ दिले जात नाहीये, आम्हाला बोलू दिले जात नाहीये. कसेबसे काही पत्रकार आमच्यापर्यंत पोहचले, नाहीतर आमच्यासोबत यांनी काय केले असते, आम्हालाच माहित नाही.'

प्रियंका गांधींनी केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पोलिसांनी पीडितेची मेडिकल रिपोर्टदेखील दिली नसल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. हाथरसचे पोलिस अधीक्षक विक्रांत वीर यांचे म्हणने आहे की, पीडितेवर सामुहिक बलात्कार झाला आहे का नाही, याची पुष्टी अद्याप मेडिकल रिपोर्टमधून झालेली नाही. दरम्यान, सफदरजंग हॉस्पीटलमध्ये काल रात्री आंदोलन करणाऱ्या आजाद समाज पार्टीचे नेते चंद्रशेखर यांना अटक केली आहे.

या घटनेविरोधात हथरसमध्ये जागोजागी प्रदर्शन होत आहे
या घटनेविरोधात हथरसमध्ये जागोजागी प्रदर्शन होत आहे

कसा झाला अंत्यविधी

15 दिवसांपूर्वी कथित गँगरेप झालेल्या पीडितेचा सोमवारी सफदरजंग हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. मंगळवारी पीडितेचे कुटुंबिय हॉस्पीटलमध्ये धरण्यावर बसले. रात्री युपी पोलिस त्यांना आपल्या गाडीतून हथरसला नेले. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री 2.30 वाजता पीडितेवर गुपचूप अंत्यविधी पार पाडला. पत्रकार आणि कुटुंबियांना दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी मानवी साखळी तयार केली होती. कोणालाच मृतदेहाच्या जवळ जाऊ दिले नाही.

पोलिसांच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह

पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांवर प्रकरण दाबण्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणने आहे की, पोलिसांनी घाई-घाईने अंत्यविधी करुन पोस्ट मॉर्टम करण्याचा मार्गही बंद केला. पीडितेचा भाऊ म्हणाला, आम्ही दलित असल्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. आधी आरोपींना पकडले नाही आणि नंतर घाईत अंत्यविधी उरकला.