आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हाथरस गँगरेप पीडितेवर अंत्यसंस्कार केल्याच्या 3 दिवसांनंतर पोलिसांनी मीडियाला पीडितेच्या गावात (बुलगढी) प्रवेश दिला आहे. पीडित कुटुंबाने मीडियाशी बोलताना पोलिस आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मुलीची आई म्हणाली, "अखेरच्या क्षणी देखील मुलीचे तोंडसुद्धा पाहू दिले नाही, कोणाचे प्रेत जाळले आणि कोणाची अस्थी आणली हे देखील आम्हाला माहीत नाही."
'डीएमची नार्को टेस्ट करायला हवी'
पीडितेची वहिनी म्हणाली की, पोलिसांनी आम्हाला मारहाण केली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी. आमची नार्को टेस्ट करणार असल्याचे बोलले जात आहे, मात्र डीएमची नार्को टेस्ट करायला हवी. आम्ही तर खरे बोलत आहोत. दुसरीकडे पीडितेच्या भावाने सांगितले की, पोलिस बुधवारी रात्री दहा वाजेपर्यंत घरात थांबले. यावेळी कोणालाही कोठेही जाऊ दिले नाही. तपासणी योग्य प्रकारे व्हावी अशी आमची इच्छा आहे.
सध्या फक्त मीडियाला एंट्री, नेत्यांना नाही
हाथरस सदरचे एसडीएम प्रेम प्रकाश मीणा म्हणाले की, सध्या फक्त मीडियाला गावात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित लोकांच्या परवानगीचे आदेश येताच सर्वांना सांगितले जाईल. दरम्यान पीडित कुटुंबातील सदस्यांचे फोन घेण्यात आले आहेत आणि त्यांना घरात कैदेत ठेवल्या आरोप चुकीचा असल्याचे देखील प्रेम प्रकाश यांनी सांगितले.
हाथरसच्या एसपीसह 5 पोलिस निलंबित
हाथरस प्रकरणात पोलिस-प्रशासनाच्या वृत्तीचा निषेध म्हणून देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान योगी सरकारने पोलिसांवर कारवाई केली. शुक्रवारी सरकारने हाथरसचे एसपी विक्रांत वीर यांच्यासह 5 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
डीएमविरोधात अद्याप कारवाई झालेली नाही
सामूहिक बलात्कारित मुलीचा मृतदेह घाईघाईत जाळल्यानंतर पोलिस-प्रशासनावर सतत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. कुटुंबाने आरोप केला की, डीएम प्रवीणकुमार लक्षस्कर यांनी दबाव आणला होता आणि म्हटले होते की, मुलगी कोरोनामुळे मेली असती तर नुकसान भरपाई मिळाली असती का? दरम्यान सरकारने डीएम विरोधात अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हाथरस जिल्ह्यातील चंदपा भागातील बुलगढी गावात 14 सप्टेंबर रोजी चौघांनी 19 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार केला होता. आरोपींनी तिचा मणका तोडला आणि तिची जीभ देखील छाटली होती. या युवतीचा दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी रात्री पोलिसांनी मृतदेह गावात आणला आणि जाळला. याप्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, युवतीवर बलात्कार झाला नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.