आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हाथरसच्या बुलगढी गावात 19 वर्षांच्या दलित मुलीवर कथित गँगरेप आणि तिच्या मृत्यू प्रकरणी गुरुवारी नवा खुलासा झाला आहे. मुख्य आरोपी संदीपने 7 अक्टोबरला तुरुंगातून हाथरसच्या एसपींना पत्र लिहिले, हे गुरुवारी समोर आले. संदीपने स्वतः ला आणि इतर तीन आरोपींना निर्दोष असल्याचे सांगत पीडितेची आई आणि तिच्या भावावर गंभीर आरोप लावले आहेत.
संदीपने म्हटले, 'मुलीसोबत त्याची मैत्री होती. हे तिच्या कुटुंबाला पसंत नव्हते. घटनेच्या दिवशी मी तिथेच होतो, मात्र मला मुलीच्या आई आणि भावाने घरी पाठवून दिले होते. नंतर मला आरोपी बनून तुरुंगात पाठवण्यात आले. मुलीला तिचा भाऊ आणि आईने मारहाण केली होती. यामुळे तिचा मृत्यू झाला.' संदीपने निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. लेटरवर इतर आरोपी, रवी, रामी आणि लवकुश यांचे नाव लिहिले आणि अंगठा लावण्यात आला आहे.
पत्रात संदीपने लिहिले - एसपी साहेब, आम्हाला न्याय द्या
संदीपने लिहिले, 'मला 20 सप्टेंबर रोजी खोट्या केसमध्ये तुरुंगात पाठवले. माझ्यावर आरोप लावण्यात आला की, मी गावातील मुलीसोबत वाईट कृत्य आणि मारहाण केली होती, यानंतर तिचा मृत्यू झाला. या खोट्या केसमध्ये वेगवेगळ्या दिवशी गावातील तीन इतर लोक लवकुश, रवी आणि रामूला तुरुंगात पाठवण्यात आले. ते माझे नात्याने काका आहेत. पीडिता गावातील चांगली मुलगी होती, तिच्यासोबत माझी मैत्री होती. भेटीसोबतच तिचे आणि माझे कधी-कधी फोनवरही बोलणे होत होते, मात्र आमची मैत्री तिच्या कुटुंबियांना पसंत नव्हती. घटनेच्या दिवशी तिची आणि माझी शेतात भेट झाली होती. तिच्यासोबत आई आणि भाऊदेखील होते. ती म्हणाल्या नंतर मी माझ्या घरी गेलो आणि वडिलांसोबत प्राण्यांना पाणी पिण्यास दिले. यानंतर मला गावातील लोकांकडून कळाले की, माझ्यासोबतच्या मैत्रीमुळे तिला तिची आई आणि भावाने मारले होते, यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. यानंतर तिचा मृत्यू झाला. मी पीडितेला कधीच मारहाण आणि चुकीचे काम केलेले नाही. या प्रकरणी मुलीची आई आणि भावाने मला आणि तीन इतर लोकांना खोट्या आरोपांमध्ये फसवून तुरुंगात पाठवले आहे. आम्ही सर्व जण निर्दोष आहोत. कृपया, या प्रकरणाचा तपास करुन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा.'
तुरुंगात जीवाला धोका असल्याचे सांगितले
याच काळात आरोपींच्या कुटुंबीयांनी तुरुंगात आपल्या मुलांच्या जीवास धोका असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, आमचे मुलं तुरुंगात सुरक्षित नाहीत. आरोपी रामूच्या वहिणीने म्हटले की, तुरुंगात नेते भेटण्यासाठी जात आहेत. असे म्हटले जाते की, तुरुंगात सुरक्षा असते, मात्र माझ्या मुलांना तुरुंगात धोका आहे.
6 महिन्यात 104 वेळा फोन कॉल्सचा खुलासा झाला होता
मुख्य आरोपी संदीप आणि तरुणीच्या भावामध्ये फोन कॉल्सविषयी मोठा खुलासा झाला होता. दोघांमध्ये 13 अक्टोबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत 104 वेळा बातचित झाली. पूर्ण कॉल ड्यूरिएशन जवळपास 5 तासांचे आहे. तर दोन्हींचे घर 200 मीटरच्या अंतरावर आहे. 62 कॉल संदीपने तर 42 कॉल पीडितेच्या भावाकडून एकमेकांना करण्यात आले आहेत. कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर) दैनिक भास्करजवळ आहे. सीडीआर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या डिटेलची कोणतेही अधिकारी आणि तपास एजेंसीने पुष्टी केलेली नाही. पीडितेच्या भावाचा फोन त्याची पत्नी वापरत होती. असा तपास पथकातील सूत्रांचा दावा आहे. याच फोनवरुन पीडित आणि संदीप यांच्या बातचित झाल्याचा दावा केला जात आहे. सीडीआरमध्ये दोघांमधील संभाषण रात्रीच्या वेळी सुमारे 60 कॉल असल्याचे आढळले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी करणार्या एसआयटीला गृह विभागाने आणखी 10 दिवसांचा कालावधी दिला आहे.
पूर्ण प्रकरण काय?
हाथरस येथे 14 सप्टेंबरला 4 लोकांनी 19 वर्षांच्या दलित तरुणीसोबत कथिक स्वरुपात सामूहिक बलात्कार केला होता. आरोपींनी तरुणीचे पाठीच्या मनक्याचे हाड मोडले होते आणि तिची जीभ कापली होती. दिल्लीमध्ये उपचारांदरम्यान 9 सप्टेंबरला पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र पोलिसांचा दावा आहे की, मुलीवर अत्याचार झालेले नाही. मंगळवारी सरकारकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातही बलात्कार झाला नसल्याचे म्हटले होते.
योगी सरकार या प्रकरणाचा तपास SIT च्या माध्यमातून करत आहे. CBI तपासाची सिफारिशही केली आहे. पीडितेचा मृतदेह घाईघाईत जाळणे आणि निष्काळजीपणाच्या आरोपांमध्ये हाथरसच्या एसपीसह 5 पोलिसांना सस्पेंड करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.