आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच मुलीचा रातोरात केलेला अंत्यविधी, कुटुंबियांवर आणला जाणार दबाव अशा अनेक गोष्टींमुळे योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने पाच प्रश्न मोदी सरकारला केले आहेत.
हाथरस पीडितेच्या कुटुंबाचे प्रश्न :-
हाथरस के पीड़ित परिवार के प्रश्न:
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 3, 2020
1. सुप्रीम कोर्ट के जरिए पूरे मामले की न्यायिक जाँच हो
2. हाथरस DM को सस्पेंड किया जाए और किसी बड़े पद पर नहीं लगाया जाए
3. हमारी बेटी के शव को बगैर हमसे पूछे पेट्रोल से क्यों जलाया गया?
4. हमें बार-बार गुमराह किया, धमकाया क्यों जा रहा है? 1/2
प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे सवाल उपस्थित केले आहेत. तसेच या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेणे पीडित मुलीच्या कुटुंबियांचा हक्क असल्याचेही प्रियंका म्हणाल्या आहेत. काल प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. मोठ्या गदारोळानंतर त्यांना हाथरस येथे जाण्याची परवानगी मिळाली होती.
यापूर्वी एकदा राहुल आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांनी शनिवारी पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते 35 खासदारांना घेऊन पीडितेच्या घरी जाणार होते. यावेळी पोलिसांनी केवळ पाच जणांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. पीडित कुटुंबाच्या भेटीनंतरच त्यांनी मोदी सरकारला हे सवाल विचारले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.