आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hathras Gangrape Ground Report, Bulgadhi Village Ground Report Accused Family ; Grief For The Gangrape Accused In The Brahmin Area Of Bulgadi,but No Feelings About Victim; Brahmins Do Not Even Want To See Valmiki

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाथरसमधून दिव्य मराठी एक्सक्लूसिव्ह:बूलगडीच्या ब्राह्मण परिसरात गँगरेपच्या आरोपींसाठी दुःख, पीडितेबाबत मनात कोणत्याच भावना नाही; ब्राह्मणांना वाल्मिकींना बघायचीही इच्छा नाही

हाथरस7 महिन्यांपूर्वीलेखक: पुनम कौशल
  • कॉपी लिंक

एक कुभांर, एक न्हावी, चार वाल्मीकी आणि साठ ब्राह्मण आणि ठाकुर कुटुंब. इतके लोक बूलगडी गावात राहतात. महिनाभरापूर्वी येथील लोकांची आयुष्य फक्त आपल्या शेतापर्यंत मर्यादित होते. गावातील काही पुरुष हाथरस आणि आसपासच्या शहरांमध्ये मजुरी करायला जातात. बाकी सर्वजण शेतात काम करतात. महिला आपल्या नवऱ्यांच्या कामात मदत करतात आणि मुलींचे आयुष्य घरापर्यंत मर्यादित आहे. जाणून घ्या बूलगडीमधील सध्याची परिस्थिती आमच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून...

गावातील काही रस्त्यांवर पोलिसांच्या गाड्या दिसतात. पोलिसांचे बॅरिकेडही वाढले आहेत. रविवारी मी या ठिकाणी पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी राष्ट्रीय लोकदलाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. रस्त्यावर या लाठीचार्जदरम्यान पडलेल्या चपला दिसत आहेत. या गोंधळाची धुळ अजून जमिनीवर पडली नव्हती, तोवर एक गट घोषणा देत पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडच्या दिशेने येत होता.

मीडियाचे कॅमेरे या लोकांकडे वळल्यावर घोषणा वाढल्या. हा गट आरोपींच्या समर्थनार्थ सवर्ण समाजाची शक्ती दर्शवित आहेत. येथून 7 किलोमीटर दूर माजी आमदार राजवीर पेहलवानच्या घरी झालेल्या सवर्णांच्या पंचायतीचा परिणाम येथे दिसत आहे. सामूहिक बलात्कारातील आरोपींचे समर्थन आणि भीम आर्मी विरोधात जोरदार घोषणाबाजी होत आहे.

येथून शंभर मीटर दूर पोलिसांच्या दुसऱ्या बॅरिकेडिंग जवळ काही पत्रकार आराम करत आहेत. इकडे होत असलेल्या गोंधळावर जास्त लक्ष न देता, ते सर्व पत्रकार भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्या येण्याची वाट पाहत आहेत. चंद्रशेखर यांच्या येण्याने वातावरण चांगलेच तापले आहे. सवर्ण समाजातील काही तरुण उत्साहित आहेत. त्यांना चंद्रशेखर यांना गावात येण्यापासून अडवायचे आहे. यादरम्यान प्रशासनाच्या गाड्यांचा एक ताफा येतो आणि गावात जातो. यातील एका गाडीत चंद्रशेखर होते.

गावात पोलिसांचा खूप कडक पहारा आहे. आरोपींच्या आणि पीडितेच्या घराबाहेर आणि घरांच्या छतावर सशस्त्र पोलिस जवान उभे आहेत. दंगल परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह हे पोलिस कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहेत. पीडित कुटुंबाची भेट झाल्यानंतर पोलिस चंद्रशेखर यांना घेऊन जातात. यादरम्यान चंद्रशेखर म्हणतात, 'माझे (पीडित)कुटुंब इथे सुरक्षित नाही, लवकरच मी त्यांना माझ्या सोबत घेऊन जाईल.' काही क्षणातच पोलिस चंद्रशेखर यांना घेऊन निघून जातात.

पीडितेच्या घरामागून जाणारा रस्ता ब्राह्मणांच्या परिसराकडे जातो. महिला दारात उभ्या आहेत, तोंड बंद आहे आणि डोळ्यात एकच प्रश्न आहे. यावेळी एका महिलेने विचारले, मॅडम हे सर्व कधी शांत होईल. मीडिया गावातून कधी जाईल ? शेतात बटाटे लावायची वेळ जवळ आली आहे, या सर्वामुळे आमचे सर्व काम बंद पडले आहे. आमचे मिस्टर ड्युटीवर जातात, परत घरी येईपर्यंत आम्हाला चिंता होते की, पोलिस त्यांना गावात येऊ देतील का नाही.

मी या महिलेला प्रश्न विचारत होते, इतक्यात एक दुसरी महिला माझ्या जवळ आली आणि मला विचारले, 'मुली तू मला फक्त इतकं सांग की, रामू सुटेल का नाही. बिचाऱ्याला नीट ऐकू येत नाही, तो खूप शांत आणि गाईसारखा भोळा आहे.' रामू त्या चार आरोपींपैकी एक आहे, ज्यांना कथित गँगरेप प्रकरणात अटक झाली आहे. तो तीन मुलांचा बाप आहे आणि डेअरीवर काम करतो.

यादरम्यान आपल्या घराबाहेर बसलेला एक तरुण म्हणतो, 'संदीपचे माहित नाही, पण इतर तिघांना मुद्दामुण अडकवले आहे. ते तिघे निर्दोष आहेत. जर रामूला फाशी झाली, तर समजा गाईला मारले. नंतर या गावात काहीच ठीक होणार नाही.' ब्राह्मण परिसरातील लोकांना रामूच्या अटकेने मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान दुसरा एक तरुण म्हणाला की, आम्ही रामूला सोडवण्यासाठी काहीही करू.'

आम्ही या तरुणाशी बातचीत करत होतो, तेवढ्यात एक वाल्मीकी मुलगा डुकरांना हकलताना दिसला. त्याला पाहताच महिला आपले तोंड वाकडे करतात. एक महिला म्हणते की, हे लोक आमच्या चांगल्या आलेल्या पीकांचे नुकसान करतात. दुसरा एक व्यक्ती म्हणतो की, माझ्या पाच एकर जमिनीवर लावलेल्या पीकांमध्ये त्यांनी डुकरे सोडली. पण, मी त्यांना काही बोललो नाही. हे लोक दलित कायद्याने गुन्हा दाखल करतील, मग कोण त्रास सहन करत बसणार.'

या गावात चंद्रशेखर आजाद (भीम आर्मी प्रमुख)च्या गावात येण्यावरुन सर्वांना उत्साह आहे. महिलांना जाणून घ्यायचे आहे की, 'रावण' दिसतो कसा. यादरम्यान एका महिलेने माझ्या फोनमध्ये चंद्रशेखर यांचा व्हिडिओ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. चंद्रशेखर यांना पाहू म्हणाल्या, अरे हा तर आमच्यासारखा दिसतो. सकाळपासून गावात गोंधळ सुरू होता की, रावण येत आहे, संपूर्ण गावाला आग लावले. पण, हा तर सामान्य माणसांप्रमाणे दिसतो.' या परिसरापासून पीडितेचे घर खूप दूर आहे, पण त्याबद्दल कोणाला काही माहित नाही. किंवा कोणी सांगू इच्छित नाही. महिला म्हणाल्या की, आम्ही तिकडे जात नाही. ते वाल्मीकी आहेत, आम्ही ब्राह्मण आहोत.

पीडित कुटुंबाला गाव सोडायचे आहे. याबद्दल विचारल्यावर महिला म्हणाल्या की, 'त्यांना इतका पैसा मिळाला, घर मिळाले, नोकरी मिळाली, आता इथे राहून काय करणार. पण, ते गावातून गेल्यावरही गावातील वातावरण ठीक होणार नाही.' या महिलांना पीडितेच्या मृत्यूपेक्षा 'निर्दोष ठाकुरां'च्या अटकेवर जास्त दुःख आहे. 'नार्को' शब्द त्यांना माहित नाही, पण सारख-सारख त्या या शब्दाचा वापर करत आहेत. म्हणत आहे की, आता नार्को करुनच सत्य समोर येईल. पीडित कुटुंब खरं बोलत असेल, तर त्यांनी आपली नार्को करुन घ्यावी.

यादरम्यान, एका तरुणाने सांगितले की, तो संदीपचा मित्र आहे. तो म्हणाला की, संदीपची चुकी फक्त इतकी होती की, त्याने वाल्मीकी मुलीवर प्रेम केले. या प्रेमामुळे अनेकवेळा त्याला घरच्यांना मारलेही. त्या मुलीवर खर्चा करण्यासाठी आपल्या बहिणीचे कानातले विकले होते. जेव्हा मी त्याला विचारले की, ती मुलगीही त्याच्यावर प्रेम करत होती का, त्यावर त्याने उत्तर दिले नाही.

पीडित घरातील तिसऱ्या नंबरची मुलगी होती. घरात तिची कमतरता भासते, पण तिचे कोणतेच सामान आता घरात दिसत नाही. 19-20 वर्षांची ही मुलगी आपल्या घरच्यांना नेहमी कामात मदत करायची. आईसाठी विश्व आणि वडिलांसाठी एक मोठी जबाबदारी होती. तिचे आपले स्वतःचे अस्तित्व काय होते ? ती काय विचार करायची ? तिचे काय स्वप्न होते ? हे आता कधीच कळणार नाही. तिच्या अशा जाण्याने बुलगडी गावाचे चक्र फिरवले आहे.

बातम्या आणखी आहेत...