आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hathras Gangrape | Mother's Pleas For Daughter's Funeral; The Whole Village Was Taken Prisoner By The Police

हाथरस गँगरेप:मुलीच्या अंत्यदर्शनासाठी आईच्या विनवण्या; अख्खे गाव पोलिसांकडून कैदेत

तनुश्री पांडेय | गाव बुलगढी (हाथरस, उत्तर प्रदेश)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुटुंबीयांची विनंती धुडकावत रात्री 2.30 वाजता अंत्यविधी

हाथरसमधील निर्भयाच्या आप्तांना तिला शेवटचा निरोप देता आला नाही. प्रशासनाने त्यांची इच्छा धुडकावून लावत मध्यरात्रीनंतर तिचा अंत्यविधी उरकून टाकला. गावातील घटनाक्रमाची साक्षीदार असलेली इंडिया टुडे-आजतकची वार्ताहर तनुश्री पांडेने भास्करला सांगितला प्रत्यक्ष अनुभव ..

पीडितेच्या घरापासून माध्यमांना २ किमीवरच रोखले होते. मी कशीबशी तेथून निघून सायंकाळी ७.३० ला गावात पोहोचले. पोलिस वाहनांसह रुग्णवाहिकाही आली. २०० वर पोलिसांच्या ताफ्यासोबत जिल्हाधिकारी, एसपी व सहायक दंडाधिकारीही आले. रुग्णवाहिका घराजवळ थांबलीच नाही. प्रतीक्षेतील सर्व जण रुग्णवाहिकेमागे धावले. काही जण रुग्णवाहिकेसमोर झोपले. आमचा जीव घ्या पण मुलीचा चेहरा तरी पाहू द्या, अशा विनवण्या आप्त-स्वकीय, नातेवाईक पोलिसांना करत होते. तासभर गदारोळ सुरू होता. मुलीच्या वडिलांना ढकलण्यात आले. आई सारखी गयावया करत होती. पीडितेने आईला म्हटले होते की, जर ती जिवंत राहिली नाही, तर मला घरी जरूर न्या. तुम्हाला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची इतकी घाई का झालीय, असे लोकांनी पोलिसांना विचारलेही. ५ मिनिटांसाठी तिचा मृतदेह घरी घेऊन जाऊ द्या. मुलीला हिंदू रीतिरिवाजानुसार, हळद लावून तिची शेवटची पाठवणी करण्याची विनंतीही केली. रात्री अंत्यसंस्काराची त्यांची इच्छा नव्हती. कुटुंबीय सतत तिचा चेहरा पाहण्याचा हट्ट करत होते. एका पोलिस अधिकाऱ्याने तिच्या वडिलांनाच याप्रकरणी दोषी धरले. यात २ तास गेले. कलेक्टरच्या आदेशावरून तेथे हजर सर्व लाेकांना बळजबरीने घरात कोंडले. नंतर आई-वडिलांना अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नेण्यात आले. कुटुंब रात्री अंत्यविधीस तयार नव्हते. पोलिसांनी अंत्यविधी उरकला तेव्हा गावातील कोणीही व्यक्ती तेथे नव्हती.

अंत्यविधी करताना पोलिस. सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या १९ वर्षीय दलित तरुणीचे मंगळवारी निधन झाले होते.