आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जातीवादाचे निकृष्ट विचार:हाथरस सामूहिक बलात्कारातील आरोपीच्या कुटूंबाचा अहंकार पाहा, म्हणाले - आम्हाला त्यांच्याबरोबर बसायला-बोलायलाही आवडत नाही, आमची मुले त्यांच्या मुलीला स्पर्श करतील का?

हाथरस (पूनम कौशल)7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राम्हण आणि ठाकूर शेजाऱ्यांनी पीडित कुटुंबाची विचारपूसही केली नाही, पीडित भाऊ म्हणाले - कुणी साथ देणे तर दूरच राहिले, इथे आम्हाला कुणी बोलले देखील नाही
  • आरोपीच्या वडिलांनी 20 वर्षांपूर्वी पीडिताच्या आत्याची छेड काढली होती, त्यानंतर आजोबांनी विरोध केला तर बोट कापले होते, दलित म्हणतात, ते लोक महिलांना त्रास देतात

दिल्लीपासून साधारणपणे 160 कि.मी. अंतरावर हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे गाव बुलगारी आहे. चार चाकीने खेड्यात जाणे शक्य नव्हते, म्हणून मी तेथीलच दुचाकीवरील एका युवकाकडून लिफ्ट घेतली. त्याने बोलण्यास सुरूवात असे म्हणत केली की, 'इथले लोक मरणे पसंत करतील, पण दुसऱ्या समाजासोबत उठणे-बसणे नाही.'

तो ठाकुर होता. मात्र, सामूहिक बलात्काराच्या घटनेबद्दल त्याने तीव्र खेद व्यक्त केला. तो पुढे म्हणाला, त्या दलित मुलीसोबत काहीतरी भयंकर वाईट झाले आहे. दिल्लीतही मी सफदरजंग रुग्णालयात पीडित मुलीच्या कुटूंबियांशी बोलत होतो, तेव्हा तिचा भाऊ आणि वडील वारंवार जातीचा उल्लेख करत होते. मग माझ्या मनात हा प्रश्न येत होता की आपल्या जगात अजूनही इतकी जातीयवाद आहे का? गावात पोहोचल्यावर या प्रश्नाचे उत्तरही सापडले. अट केलेल्या आरोपींच्या कुटुंबीयातील लोकांना भेटले तर ते रुबाबात म्हणाले की, 'आम्हाला त्यांच्याबरोबर बसून बोलायलाही आवडत नाही, आमची मुले त्यांच्या मुलीला स्पर्श करतील का?"

या ठाकूर आणि ब्राह्मण लोकसंख्येच्या गावात दलितांची मोजकीच घरे आहेत आणि त्यांचे जग वेगळे आहे. जातीवादाची मुळे इथे खोलवर रुजलेली आहेत. लोक बोलता बोलताच जातीचा उल्लेख करतात. असे असूनही तथाकथित उच्चवर्णीय लोकांचे असे म्हणणे होते की हे दलित कुटुंब अतिशय सज्जन आहे, ते कोणासोबत संबंध आणि द्वेष ठेवत नाहीत. गावातील एक ठाकूर महिला सांगते, "या कुटुंबातील लोक वयस्कर ठाकूरांकडे पाहून त्यांच्या सायकलवरुन खाली उतरतात आणि चालतात जेणेकरुन कोणत्याही ठाकूरला असे वाटू नये की ही माणसे आपल्या समोरुन चालत आहेत, आणि आपली बरोबरी करत आहेत''

त्या गावातील फोटो ज्या गावात 14 सप्टेंबरला दलित तरुणीवर अत्याचार झाले होते.
त्या गावातील फोटो ज्या गावात 14 सप्टेंबरला दलित तरुणीवर अत्याचार झाले होते.

येथे जातीवाद इतका खोल रुजला आहे की ब्राह्मण आणि ठाकूर शेजार्‍यांनी पीडित कुटूंबाची विचारपुसही केली नाही, त्यांच्या घरी जाणे, शोक व्यक्त करणे तर दुरची गोष्ट आहे. या घटनेनंतर मी पीडित भावाला विचारले की गावातील लोक तुम्हाला साथ देत आहेत का, तर तो म्हणाला, 'कुणी विचारपुसही केली नाही, साथ देण्याची तर दुरची गोष्ट आहे. येथे आमच्याशी कोण बोलते?'

पीडितेच्या वहिनीची अवस्था वाईट आहे. त्या पुन्हा पुन्हा ओलडून म्हणतात की, 'आमच्या मुलीचा अखेरच्या वेळीही चेहरा पाहू दिला नाही. आत्तापर्यंत आम्हाला असे वाटत होते की न्याय मिळेल, परंतु पोलिसांनी रात्री जे काही केले त्यानंतर सरकार व पोलिसांवरचा आत्मविश्वास कमी झाला. तसेच त्या म्हणतात की, 'एखादी व्यक्ती इतकी अमानुष कशी असू शकते की एखाद्याला आपल्या मुलीचा चेहरासुद्धा पाहू देणार नाही. ती माझ्याबरोबर चोवीस तास असायची, तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरत आहे.'

'मी तिच्याशी रुग्णालयातच बोलले होते, ती फक्त म्हणत होती की, मला घरी परत घेऊन जा, मी घरीच बरी होईल, मला हे अजिबात चांगले वाटत नाहीये, तिला जगायचे होते. आम्हाला तर कळत नाहीये की, दिल्लीच्या रुग्णालयात काय झाले की, तिचा मृत्यू झाला. आम्हाला आशा होती की, ती बरी होऊन घरी परतेल. दीदीवर चांगले उपचार मिळाले नाहीत'

पीडितेच्या कुटुंबातील फोटो, पीडितेच्या आईची अवस्था वाईट आहे. तर वहिणी वारंवार कोसळत आहे.
पीडितेच्या कुटुंबातील फोटो, पीडितेच्या आईची अवस्था वाईट आहे. तर वहिणी वारंवार कोसळत आहे.

मी त्यांना विचारले की, कधी ती मुख्य आरोपी संदिपविषयी काही तक्रार केली होती किंवा कधी त्याच्यासोबत बोलणे झाले होते. तर त्या म्हणतात की, 'तिचे कधीच संदीपसोबत कोणत्याच प्रकारचे बोलणे झाले नाही. सुरुवातीला पोलिस विचारत होते की, त्याचा नंबर आमच्या मोबाईलमध्ये आहे. पण ज्याच्यासोबत आम्हाला काही बोलायचे नाही, ज्यासोबत आमचे काही घेणेदेणे नाही, त्याचा नंबर आमच्या मोबाईलमध्ये का असेल? आम्ही असे लोक दिसतो का की, बाहेरच्या लोकांशी संपर्क ठेवू? तो तर आमच्या जातीचाही नव्हता. दुसऱ्या जातीतील लोकांना आम्ही ओळखतही नाही. आमच्या घरातील बायका फक्त आपल्या कामापुरते बघतात. बाहेर कोण येतंय, कोण जातंय, त्यावर आम्ही लक्ष देत नाही. आमच्या घरात एकच फोन आहे तो देखील पापा किंवा भावाजवळ असायचा.'

हे आरोपी मुलांचे घर आहे. पीडितेच्या घरापाहून जवळच आहे.
हे आरोपी मुलांचे घर आहे. पीडितेच्या घरापाहून जवळच आहे.

त्या म्हणतात, 'दीदी कधी-कधी चिंतेत दिसायच्या, पण त्यांना काय चिंता होती याविषयी त्या कधी बोलल्या नाहीत. त्या सकाळी चार वाजता उठून संध्याकाळपर्यंत घरातील कामामध्येच राहत होत्या. त्या थोड्या शांत-शांत राहायच्या पण कधीच याविषयी बोलल्या नाहीत. आम्हाला तर हेच वाटत होते की, पूर्ण दिवस काम करत असल्याने थकव्यामुळे त्यांचा चेहरा असा होत असेल. काही तरी असू शकते जे त्यांनी आम्हाला सांगितले नसेल.'

मीडियाचे कॅमेरे कसेतरी टाळून पीडितेची आई स्वयंपाकघरातील विखुरलेली भांडी जमा करण्याचा प्रयत्न करते. त्यांचे डोळे अश्रूंनी लाल झाले आहेत. घसा बसला आहे. त्या अनेक दिवसांपासून झोपू शकलेल्या नाहीत. त्या म्हणाल्या, जोपर्यंत मुलगी होती, तोपर्यंत स्वयंपाकघर पाऊल ठेवत नव्हते, ती कशालाच हात लावू देत नव्हती. ते असे म्हणताच त्यांचा कंठ दाटून येतो आणि अश्रू बोलू लागतात. ज्या मुलीचा आपल्या घराबाहेरच्या जगाशी कोणताही संबंध नव्हता, तिच्या अशा वेदनादायी मृत्यूने कुटुंब संपूर्ण कोसळले आहे.

पीडितेचे कुटुंब आणि दलितांना भीती आहे की, एकदा मीडियाचे कॅमेरे येथून गेले तर त्यांना त्रास होईल. येथे दलितांजवळ जमीन नाही आणि या लोकांना तथाकथित उच्च जातीच्या लोकांच्या शेतातच काम करावे लागते. पशूंसाठी गवत कापण्यासाठीही त्यांनाच शेतात जावे लागते.

मंगळवारी रात्री पोलिस जसे वागले, ज्या प्रकारे पीडितेच्या कुटूंबाला बळजबरीने घर बंद करुन मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर असुरक्षितता आणखी वाढली आहे. पीडितेच्या कुटूंबाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पोलिस अधीक्षक विक्रांत वीर म्हणाले की, त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे, पोलिस पुढेही तैनात राहतील. परंतु या विभाजित समाजात पोलिस किती काळ सुरक्षा पुरवू शकतील हा प्रश्नच आहे.

पोलिसांनी मंगळवारी रात्री मुलीवर अंत्यसंस्कार केले.
पोलिसांनी मंगळवारी रात्री मुलीवर अंत्यसंस्कार केले.

पीडित मुलीविषयी गावातील जेवढ्या लोकांशी बातचित केली सर्वच एकच म्हणत होते की, ती खुप साधी मुलगी होती, घरातून खूप कमी वेळा बाहेर निघायची. कधी-कधी आपल्या आईसोबत गवत कापण्यासाठी जात होती. तेव्हाही कुणाशीच काहीच बोलायची नाही. स्कूल कॉलेजमध्ये ती कधी गेली नव्हती, म्हणून तिला बाहेरच्या जगाची जास्त समज नव्हती.

तिच्या निधनानंतर गावातील मुलींमध्ये, विशेषत: दलित कुटुंबातील मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याच्या चेहऱ्याव भीती स्पष्ट दिसते. जेव्हा मी दलित मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती फारशी बोलत नाही. ती म्हणाली, 'इतक्या चांगल्या दीदीसोबत एवढे वाईट झाले. आता शेतात जाण्याचे धाडस कोण करणार? पण जावे तर लागेलच. ढोर भुकेने मरणार नाहीस.'

पीडित आणि आरोपीच्या घरांमध्ये फारसे अंतर नाही. आरोपीच्या घरात फक्त महिला आणि लहान मुले दिसतात. आपल्या घरातल्या मुलांचा बचाव करत असताना, ती वारंवार म्हणते की या छोट्या जातीच्या लोकांशी तिच्या कुटुंबाचा काही संबंध नव्हता. जुन्या वादात आमच्या मुलांना फसवण्यात आले आहे. आपल्या मुलांचा बचाव करताना, ती महिला पीडितेच्या चारित्र्यावर अत्याचार करण्याची कोणतीही संधी सोडत नाही.

ज्या जुन्या वादाविषयी त्या बोलत होत्या त्याचा संबंधही छेडछाडीच्या घटनाशीच होता. पीडितेच्या आत्यासोबत आरोपीच्या वडिलांनी वीस वर्षांपूर्वी छेडछाड केली होती. तेव्हा पीडतेच्या आजोबांनी विरोध केला होता तेव्हा त्यांची बोटे कापण्यात आली होती. गावातील लोक त्या घटनेचा उल्लेख करत म्हणतात की, आरोपींचे कुटुंब असेच आहे, हे लोक पहिल्यापासूनच महिलांना त्रास देतात. हे दादागिरी करतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन मारामारी करतात. यामुळे कुणीही त्यांच्याविरुद्ध बोलत नाही, पोलिस स्टेशनमध्ये जात नाही.

पीडितेच्या गावात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत.
पीडितेच्या गावात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत.

आरोपी रामूची आई म्हणते की, 'ठाकूरांकडून नुकसानभरपाई मिळवण्यासाठी हे निम्न जातीचे लोक आम्हाला खोट्या खटल्यांमध्ये अडकवतात. आम्हाला देवाच्या न्यायालयात विश्वास आहे, आमचा कृष्ण देव न्याय करेल. माझा मुलगा त्या दिवशी ड्युटीवर होता. ज्याला शंका आहे त्यांनी कंपनीचे रजिस्टर पाहून यावे, परंतु आमचे कोण ऐकेल. प्रत्येकजण तर त्या कुटुंबासमवेत आहे. मंत्री-संत्री सर्व तिथेच जात आहेत. ज्या कुटुंबाला एवढे सर्व मिळेल तर ते आम्हालाच बोलतील. '

या घटनेवर काही जणांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की एफआयआर 3 वेळा बदलला गेला आणि पीडितेनेही निवेदन बदलले. या प्रश्नावर एसपी म्हणतात, 'पीडितेने वक्तव्य केल्याप्रमाणे आम्ही केस दाखल केली. निवेदने व्हिडिओ रेकॉर्ड केली आहेत. महिला पोलिसांनी रुग्णालयात तिचे निवेदन नोंदवले आहे. तिने तिच्यासोबत सामूहिक बलात्कार जाल्याबद्दल सांगितले आहे. त्याच आधारे अटक करण्यात आली आहे.'

एसपी म्हणतात, 'मुलीची जीभ कापण्यात आली नव्हती. मनक्याचे हाड नाही, गळ्याचे हाड मोडले होते. सध्या जो मेडिकल रिपोर्ट आला आहे त्यामध्ये लैंगिंक शोषणाची पुष्टी झालेली नाही. फरेंसिक रिपोर्टची प्रतिक्षा आहे. आम्ही सर्व पुरावे गोळा करत आहोत.'

पीडित मुलगी यापूर्वी बलात्काराबद्दल का बोलली नाही या प्रश्नावर तिची आई म्हणाली, "तीन दिवसांनी जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने सर्व काही सांगितले. पूर्ण जबाब दिला. तिला न्याय हवा होता.' काल रात्री एसआयटीची टीमही या घटनेवरुन निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गावात पोहोचली आहे. जे एका आठवड्यात अहवाल सादर करणार आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टही लक्ष ठेवून आहे. कलम 144 लागू करत पोलिसांनी हाथरसांच्या हद्दी सिल केल्या आहेत. माध्यमांना आता गावात जाऊ दिले जात नाही, काल रात्री एसआयटी आली होती आणि आता ती गावाला भेट देत आहे.

बातम्या आणखी आहेत...