आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 'Hathras' In The Direction Of Ethnic Conflict ..., Crime Happened Before, Now Politics Is On Fire

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:'हाथरस’ जातीय संघर्षाच्या दिशेने..., आधी घडला गुन्हा, आता पेटले राजकारण

हाथरस / धर्मेंद्रसिंह भदौरिया7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाथरसमध्ये पीडितेच्या घरी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. एका पोलिसाने तर त्यांचे असे कपडेही ओढले. - Divya Marathi
हाथरसमध्ये पीडितेच्या घरी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. एका पोलिसाने तर त्यांचे असे कपडेही ओढले.
  • ठाकूर-ब्राह्मणांच्या गावात जीव मुठीत घेऊन जगताेय, न्याय मिळवूच : पीडित कुटुंबीयांचा निर्धार

उत्तर प्रदेशातील हाथरस येथून अंदाजे १० किलाेमीटर अंतरावरील आग्रा मार्गावर हमरस्त्यापासून दाेन किलाेमीटर आत बाजरी आणि धानाच्या शेतीच्या पुढे बुलगढी गाव लागते. दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराने सारा देश हादरवून टाकणारे हेच ते गाव. शेताच्या समाेरच गाव सुरू झाल्यानंतर तिसरे घर लागते ते हाथरसच्या मुलीचे. पहिल्यांदा बलात्कारासारखा गंभीर गुन्हा घडला आणि नंतर त्याचे राजकारण सुरू झाले. सध्या या गावातील वातावरण पाहता येथे जातीयवाद पेटला असल्याचे स्पष्ट दिसते. दाेन खाेल्या आणि व्हरांडा असलेल्या या घराला चाेहाेबाजूंनी माध्यमांनी वेढलेले आहे. तुळशीच्या रोपाजवळ बसलेली मुलीची एटाहून आलेली मावशी म्हणाली की, आमचे कुटुंब खोटारडे नाही. अनेक दिवसांपासून साधी चटणी-पाेळी आणि बिस्किटे खाऊन हे कुटुंब जगत आहे. एक कप चहा विचारायलाही कुणी आले नाही. पीडितेच्या आईच्या मनात प्रचंड धास्ती आहे. ती म्हणाली, आम्हाला धमक्या येत आहेत. आमच्या मुलांना काही झाले तर आम्ही तुम्हाला साेडणार नाही, अशा शब्दांत उच्चभ्रू लोक धमकावत आहेत... पण आम्हाला गाव सोडावे लागले तरी चालेलख् पण मुलीला न्याय मिळवून देऊच.

या तरुणीच्या घरापासून काही अंतरावर आराेपी रामूचे घर आहे. रामूची आई म्हणते, की माझ्या मुलाला मुद्दाम यात अडकावले आहे. घटना घडली त्या दिवशी ताे दूध प्रकल्पाच्या ठिकाणी हाेता. १४ सप्टेंबरला झालेल्या घटनेनंतर पाेलिस व प्रशासनाच्या भूमिकेवरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पाेलिस आणि प्रशासनाच्या कारवाईबद्दल कोणीही समाधानी नाही. प्रकरणाची चाैकशी आणि कारवाईबद्दल साशंकता आहे. दुसरीकडे, या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता मौन बाळगून असलेला उच्चभ्रू समाज न्यायवैद्यक तपासणी अहवालानंतर एकदम आक्रमक झाला. कारण, अहवालात सामूहिक बलात्कार झाल्याच्या आरोपाला पुष्टी मिळालेली नाही. हा उच्चवर्णीय समाज आता एकजूट झाला असून याबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात आहे. शुक्रवारी सवर्ण समाजातील १२ गावांनी आरोपींच्या समर्थनार्थ बागणा गावात पंचायत आयोजित केली.

आरोपी निर्दोष असल्याचा दावा पंचायतीत करण्यात आला. नंतर सीबीआय तपासाची व नार्को चाचणीच्या निर्णयानंतर गावकरी समाधानी दिसले. भाजपचे माजी आमदार राजवीरसिंग पहलवान यांनी अनुसूचित जातीच्या मुलीचा मृत्यू ऑनर किलिंग असल्याचे म्हटले आहे. मुलीची आई आणि भावावरच तिच्या हत्येचा आरोप करण्यात आला. पंचायत प्रमुख रूपबती यांनी सांगितले की, गावात ठाकूर व ब्राह्मणांची संख्या सर्वाधिक आहे. दलित कमी आहेत. प्रसूती तज्ञ डॉ. दुष्यंत सिंह म्हणतात की, याची निष्पक्ष चौकशी व्हावी. या घटनेवरून राजकीय पोळी भाजली जात आहे. घडले ते घृणास्पद आहे. दोषींना शिक्षा व्हायलाच हवी. परंतु निष्पाप लोकांना अडकवू नये. हाथरसचे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हरीश शर्मा म्हणतात, पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शंका उपस्थित होते. राजकीय मंडळी त्यांच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. लोकांची संवेदनशीलताच संपली आहे.

सीबीआय चौकशी होणार, राहुल-प्रियंकानेे घेतली पीडित कुटुंबाची भेट
- शनिवारी नाट्यमय घडामाेडीत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हाथरसला जाण्याची घाेषणा केल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पाच काँग्रेस नेत्यांना जिल्हा प्रशासनाने तेथे जाण्याची परवानगी दिली.
- प्रचंड गर्दीत राहुल-प्रियंका यांच्यासह अन्य नेत्यांनी पीडितेच्या कुटंुबीयांच्या घरी पोहोचून त्यांची बंद खोलीत भेट घेतली. प्रियंकाने पीडित मुलीच्या आईला धीर दिला. राहुल यांच्यासह के.सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी व पु.ल. पुनिया गेल्याचे सूत्रांनी सांगितले
- मुख्यमंत्री योगींनी सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पीडितेच्या काकू म्हणाल्या, की आम्हाला सीबीआय चौकशी नको आहे. न्यायालयीन चौकशी हवी आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांच्या ताफ्याला वाराणसीत सपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखले.

बातम्या आणखी आहेत...