आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hathras Not Only In UP, But Also In Jharkhand, High Court Slaps Police In Giridih Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रांची:‘हाथरस’ फक्त यूपीतच नाही, झारखंडमध्येही अशा घटना, गिरिडीहप्रकरणी हायकोर्टाने पोलिसांना फटकारले

रांची4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूपीत 20 वर्षीय दलित महिलेवर सामूहिक अत्याचार

झारखंड उच्च न्यायालयाने राज्याच्या गिरिडीह जिल्ह्यात या वर्षी मार्चमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि तिला जाळून मारण्याच्या प्रकरणाच्या तपासात बेपर्वाई केल्याबद्दल पोलिसांना फटकारले. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले.

पीडितेच्या वडिलांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी करताना न्यायमूर्ती आनंद सेन म्हणाले की, ‘हाथरस फक्त उत्तर प्रदेशातच नाही, येथेही एक हाथरस आहे.’ अलीकडेच उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका युवतीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी संपूर्ण देशभर जबरदस्त आक्रोश आहे. हाथरस प्रकरणाचा अशा प्रकारे उल्लेख करून न्या. सेन म्हणाले, शवविच्छेदन अहवालानुसार मुलगी १००% जळाली होती पण त्याचा तपास व्यवस्थित झाला नाही.

यूपीत 20 वर्षीय दलित महिलेवर सामूहिक अत्याचार
उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यातील लिलौली भागात २० वर्षीय दलित महिलेवर गुरुवारी संध्याकाळी दोघांनी अत्याचार केला. पोलिसांनी अमन यादव आणि गुड्डू यादव या दोन आरोपींना अटक केली आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser