आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातून सोमवारी रात्री पोलिसांनी वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) या संघटनेतील चार लोकांना अटक केली. पकडलेल्यांना या चौघांकडे हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाशी संबंधित भडकाऊ साहित्य सापडले आहे. पोलिसांनी त्यांचे मोबाइल, लॅपटॉप जप्त केले आहेत.
पोलिस आणि गुप्तचर संस्था आरोपींची चौकशी करत आहेत. रविवारी हाथरसच्या बहाण्याने यूपीमध्ये जातीय हिंसाचार भडकावण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला. त्यात पीएफआयचे नावही समोर आले होते. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक वादग्रस्त इस्लामिक संघटना आहे. याचे हेड ऑफिस दिल्लीच्या शाहीन बागमध्ये आहे. ही संघटना नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) विरोधात दिल्लीत झालेल्या हिंसाचारात सहभागी होती.
पोलिसांना आधीच इनपुट मिळाला होता
एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी सांगितले की, "काही संशयितांची दिल्लीवरुन हाथरसला येण्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुप्तचर संस्थांनी हाथरसजवळ अलर्ट जारी केला होता. सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मथुरेत टोल नाक्यावर वाहनांची चेकींग सुरू होती. यादरम्यान एका स्विफ्ट डिजायर कार (DL 01 ZC 1203) ला थांबवण्यात आले. कारमध्ये चार जण होते, चौकशीदरम्यान यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, हे सर्व PFI आणि CFI शी संबंधित आढळले."
पकडलेल्या 4 पैकी 3 आरोपी यूपीचे
अटक झालेल्या आरोपींमध्ये मुजफ्फरनगरचा अतीक, बहराइचचा मसूद अहमद, रामपुरचा आलम आणि केरळच्या मल्लपुरमचा सिद्दीक सामील आहे. सध्या गुप्तचर संस्था याचा शोध घेत आहे की, हाथरसच्या बहाण्याने उत्तर प्रदेशात हिंसाचार भडकवण्याच्या कटात अजून कोण सामील आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.